आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. लोया प्रकरण : चार न्यायाधीशांच्या जबाबावर शंका घेण्याची गरज नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- न्यायमूर्ती बी.एच. लोयांचे निधन हे नैसर्गिक कारणाने झाल्याचे त्यांच्यासाेबत शेवटच्या दिवसापर्यंत राहणाऱ्या ४ न्यायमूर्तींनी सांगितले आहे. त्यांच्या जबाबावर शंका घेण्याचे कारण नाही, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. मृत्यूचा स्वतंत्र तपास करण्यासाठी दाखल याचिकेला सरकारने विरोध दर्शवला आहे.   


महाराष्ट्र सरकारचे वकील मुकुल रोहतगी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर म्हणाले की, माझ्या मते ४ न्यायमूर्तींनी (कुलकर्णी, बर्डे, मोदक व आर.आर.राठी) लोयांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. चौघेही २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१४ पर्यंत त्यांच्यासाेबत होते. जबाबावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याचिकाकर्ते ३ वर्षे गप्प हाेते; मग आताच का शिळ्या कढीला ऊत आणला जात अाहे, असे विचारत रोहतगी यांनी खटला बंद करण्याची मागणी केली. या प्रकरणात राज्य सरकार पूर्णपणे समाधानी असल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...