आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्‍या वक्तव्यावरून राज्यसभेत आठवड्यापासून निर्माण झालेली कोंडी अखेर फुटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यसभेत आठवड्यापासून निर्माण झालेली कोंडी अखेर बुधवारी फुटली. मात्र, केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या सेक्युलॅरिझमबद्दल केलेल्या वक्तव्याने पुन्हा गोंधळ झाला आणि कामकाज ठप्प झाले.


बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी हेगडेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, ज्या व्यक्तीचा घटनेवर विश्वास नाही त्याला मंत्री किंवा खासदार राहण्याचा अधिकार नाही. दरम्यान, गोंधळातच विराेधकांनी हेगडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज ४ वेळा तर राज्यसभेचे कामकाज २ वेळा तहकूब करावे लागले.

 

प्रकरण काय?

पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये प्रचारादरम्यान डॉ. मनमोहनसिंग व हमीद अन्सारी यांच्यावर पाकिस्तानशी हातमिळवणी करून कट रचल्याचा अारोप केला होता. यावर बुधवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवेदन केले. या दोन्ही नेत्यांच्या देशनिष्ठेचा आम्ही सन्मानच करतो, असे जेटली म्हणाले. 


केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राज्यघटनेतील सेक्युलर शब्दाचा उल्लेख करून घटना बदलण्यासाठीच आम्ही आहोत, असे वक्तव्य केले हाेते. यावरून कोंडी निर्माण झाली होती.

बातम्या आणखी आहेत...