आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण, बँकेच्या मोफत सेवांवर शुल्क लावण्याची व्हायरल बातमी ही अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा 20 जानेवारीपासून बंद होणार असून त्यासाठी चार्ज लागणार अशा बातम्यांनी सध्या सोशल मीडियावर धूम उडवली आहे. पण ही बातमी खरी नसून अफवा असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या अफवांकडे दुर्लक्ष करावे असे अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे., इंडियन बँक असोसिएशननेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 


मॅसेजवर अर्थमंत्रालयाचे रिट्वीट 
- ट्वीटरवर अशाच प्रकारे व्हायरल होणाऱ्या एका मॅसेजला रिट्वीट करत अर्थ मंत्रालयाने म्हटले की, 20 जानेवारीपासून मोफत सेवा बंद करण्याचा असा कोणताही प्रस्ताव नाही. ही केवळ अफवा आहे. याकडे दुर्लक्ष करा. 
- मंत्रालयाने बँकिंग असोसिएशनला सल्ला दिला की, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या मॅसेजवर स्पष्टीकरण द्यावे. 


असा होता व्हायरल मॅसेज?
- गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एक मॅसेज व्हारल होत होता. त्यात म्हटले होते की, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांसाठी 20 जानेवारीसाठी शुल्क वसूल केले जाईल. 
- हा मॅसेज व्हारल झाल्यानंतर ग्राहकांमध्ये बँकांबद्दस संताप निर्माण झाला होता. आधीच मिनिमम बॅलेंन्सच्या नावाखील पैसे कापले जात असताना आता इतर सेवांसाठीही पैसे वसूल करण्याची ही योजना त्रासदायक असल्याचे लोकांचे म्हणणे होते. 


या सेवांवर शुल्क लावण्याची होती अफवा 
व्हायरल मॅसेजमध्ये म्हटले होते की, 20 जानेवारीपासून डिपॉझिट-विद्ड्रॉवल, अकाऊंटचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक बदलणे, केवायसी, पत्ता बदलने, नेट बँकिंग आणि चेक बूकसाठी रिक्वेस्टचेही पैसे लागतील. ज्या ब्रँचमध्ये अकाऊंट असेल त्याशिवाय दुसऱ्या ब्रँचमध्ये जाऊन अकाऊंट होल्डरने बँकिंग सुविधा गेतली तर त्याचा चार्ज लागेल. त्यावर 18% जीएसटीही लागेल असेही सांगितले होते. हे पैसे थेट अकाऊंटमधून कापले जाणार असल्याची चर्चा होती. 


बँक कर्मचारीही होते संभ्रमात 
- मॅसेज व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला बँकेचे कर्मचारीही संभ्रमात होते. मॅसेज खरा समजून एसबीआय, यूबीजीबी (उत्तर बिहार ग्रामीण बँक), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियाच्या अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते की, नव्या चार्जेस बाबत आदेश मिळाले आहेत. 
- नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या दिशा निर्देशांचे पालन करतो. हा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर सर्वाधिक निगेटिव्ह इमेजची भिती एसबीआय कर्मचाऱ्यांना होती. 

 

बातम्या आणखी आहेत...