आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधी खुनाच्या कटाचा तपास अंतहीन असू शकतो; सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या खुनाच्या कटाचा तपास फार पुढे गेलेला नाही. सीबीआयच्या (केंद्रीय अन्वेषण विभाग)  अहवालाचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा तपास कदाचित अंतहीन ठरू शकेल.

 

सीबीआयच्या नेतृत्वातील मल्टी डिसिप्लिनरी मॉनिटरिंग एजन्सी (एमडीएमए) राजीव गांधी खुनाच्या कटाचा तपास करत आहे. यामध्ये आयबी, रॉ आणि रेव्हेन्यू इंटेलिजन्ससह अनेक तपास यंत्रणांचा समावेश आहे. न्या. रंजन गोगोई यांच्या न्यायपीठाने राजीव गांधी हत्याकांडातील एका दोषीच्या याचिकेवर केंद्र सरकारलादेखील पक्षकार बनवले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होईल.  न्यायालयाने गेल्या १४ नोव्हेंबर रोजी दोषी ए. जी. पेरारिवलन याच्या  याचिकेवर सरकारकडे उत्तर मागितले होते. या हत्याकांडात वापरण्यात आलेला बेल्ट बॉम्ब निर्माणाच्या कटाविषयी सीबीआय तपास करत आहे. हा तपास पूर्ण होईपर्यंत आपली शिक्षा स्थगित करण्याची मागणी पेरारिवलन याने केली. 

बातम्या आणखी आहेत...