आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच आता राहुल गांधी माझेही बॉस आहेत. आता काँग्रेसच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे. भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस समविचारी पक्षांसोबत एकजुटीने लढेल, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल यांच्याबद्दलच्या भावना मांडल्या. आपण सर्वांनी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष म्हणून राहुलची निवड केली आहे. भावी वाटचालीसाठी मी त्यास शुभेच्छा देते. आता तो माझा बॉस आहे. याबद्दल मनात शंका बाळगू नका. तुम्ही सर्वांनी एकदिलाने त्याच्यासोबत पक्षकार्य करावे. निष्ठा, उत्साह, समर्पणाने तुम्ही निश्चितपणे हे काम करत आहात. पुढेही कराल अशी अपेक्षा आहे, असे सोनिया म्हणाल्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियांनी समितीच्या बैठकीत मोदी आणि भाजप सरकारच्या धोरणांवरही त्यांनी कडाडून टीका केली. भाजप सरकारने अल्पसंख्यांकांवर अन्याय केला आहे. त्यांच्या िवरोधात अत्याचार घडवून आणला. संकुचित राजकीय स्वार्थासाठी भाजपने समाजाच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न चालवले आहेत. कर्नाटकातही भाजप अशाच प्रकारचा खेळ खेळताना दिसून येईल, असे सोनियांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोनिया गांधी यांनी आपला मुलगा राहुल यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली आहे. सोनिया १९ वर्षे पक्षाच्या प्रमुख होत्या.
भाजपने धर्मनिरपेक्ष, प्रगतिशील भारताचा पराभव केला
सत्ताधाऱ्यांच्या संकुचित राजकारणामुळे हिंसाचार उफाळून आल्याचे दिसून आले आहे. गुजरातमध्येही असे झाले. आता कर्नाटकताही ते दिसेल. लोकशाहीत अशा प्रकारचे ध्रुवीकरण हा गुन्हा आहे, असे सोनियांनी सांगितले. खरे तर अल्पसंख्यांक समुदाय भाजपच्या राज्यात स्वत:ला असुरक्षित समजू लागला आहे. भाजपने धर्मनिरपेक्ष, सहिष्णु, आर्थिक, प्रगतीशील मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारताचा पराभव केला आहे, असे सोनिया म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.