आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरवचे बँकेला पत्र: बँकेने घाई केली, कर्जवसुलीचे सर्व रस्ते बंद करून टाकले, आता परतफेड विसरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी परत करण्यास नकार दिला आहे. घोटाळा सार्वजनिक करण्याबाबत बँकेने घाई केल्याचा आरोप करत यामुळे माझा ब्रँड आणि व्यवसाय बुडाला असल्याचे नीरवने एका पत्रात म्हटले आहे. वृत्तसंस्थेनुसार नीरवने हे पत्र १५ ते १६ फेब्रुवारीदरम्यान लिहिलेले होते. मात्र बँकेने १४ फेब्रुवारीला ११,३९४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे जाहीर केले. नीरवचा दावा आहे की, त्याच्यावरील बँकांची देणी ५ हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. त्याने बँकेच्या खात्यातील आपल्या रकमेतून २,२०० कर्मचाऱ्यांचे पगार देऊ देण्याची परवानगीही मागितली आहे.  


तत्पूर्वी, दिवसभरात ईडीने नीरवच्या वरळीतील समुद्र महल येथील अपार्टमेंट आणि सीबीआयने लोअर परेलमधील कार्यालयांवर छापे मारले. पाचव्या दिवशी देशातील विविध ३८ ठिकाणी छापे टाकून २२ कोटींचे हिरे व दागिने जप्त करण्यात आले. आतापर्यंत ५,७१६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सोमवारी पीएनबीच्या तीन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली. घोटाळा झालेल्या पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही सीबीआयने चौकशी केली. येथून १० कॉम्प्युटर, फायली आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले. 


प्राप्तिकर खात्याने गीतांजली समूह आणि मेहुल चोकसीच्या आणखी ७ मालमत्ता सील केल्या. अनेक कॉम्प्युटर हार्डडिस्क आणि दस्तऐवजही जप्त करण्यात आले. दरम्यान, सीबीआयने सोमवारी नीरव व मेहुलच्या कंपन्यांचे सीएफओ विपुल अंबानी आणि रवी गुप्ता, फायनान्स विभागाचे अध्यक्ष सौरभ शर्मा आणि फायनान्स एक्झिदक्युटिव्ह सुभाष प्रणव यांचीही चौकशी केली. विपुल अंबानी हे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, नीरव माेदीने ‘पीएनबी’ला लिहिलेल्या पत्रात काय म्हटले आहे....?

बातम्या आणखी आहेत...