आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या इच्छेविरुद्ध कोणी तिला स्पर्शही करू शकत नाही : कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महिलेच्या इच्छेशिवाय तिला कोणी स्पर्शही करू शकत नाही, परंतु अय्याश आणि वासनांध पुरुष  सातत्याने महिलांचे शोषण करताहेत, हेच दुर्दैवी आहे. असे लोक सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक व चित्रपटगृहे इत्यादी ठिकाणी मोठ्या संख्येने आढळतात. दिल्लीमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांनी  न्यायालयात नऊ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील आरोपीला पाच वर्षांची शिक्षा ठोठावताना ही टिप्पणी केली.  


आरोपी छवी राम याने २०१४ मध्ये मुखर्जीनगरातील मार्केटमध्ये गर्दीत मुलीला छेडले होते. न्यायालयाने म्हटले, तिच्या शरीरावर फक्त नि फक्त महिलेचा अधिकार असतो. तिच्या मर्जीशिवाय तिला कोणी स्पर्शही करू शकत नाही. मग त्याचा उद्देश कोणताही का असेना. न्यायालय म्हणाले, पुरुष महिलेच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतात. हवस पूर्ण करण्यासाठी असहाय मुलींचा लैंगिक छळ करण्यास थोडाही विचार करत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...