आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Open Letter To PM Narendra Modi By 600 Educational Institutions Around The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्काराच्या घटनांवर पंतप्रधानांचे मौन, जगभरातून 600 विचारवंतांचे मोदींना खुले पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली- कठुआ आणि सूरत येथील अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या व उन्नाव येथील मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशभरातून आंदोलन करण्यात येत आहे.  याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडले आहेत. जगभरातील सुमारे 600 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था आणि विचारवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून नाराजी वर्तवली आहे. देशात एवढी गंभीर परिस्थिती असताना मोदींनी मौन बाळगले आहे, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. 

 

हार्वर्ड, न्यूयॉर्क, ब्राऊन, कोलंबिया यांसारखी विद्यापीठे व ‘आयआयटीं’मधील शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंतांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कठुआ-उन्नाव आणि त्यानंतरच्या घटनांबाबत आम्ही क्लेश आणि दु:ख व्यक्त करीत आहोत. या घटनांनंतर त्या राज्यांतील प्रशासनाने हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी या घटनांवरून लक्ष वळवण्याचा आणि वेग‌वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. देशातील या भयंकर स्थितीवर तुम्ही आद्याप मौन बाळगून आहात. या घटनांशी आपल्या पक्षाचे असलेले संबंध नाकारता येणार नाहीत, हे सर्व आम्ही पाहात आहोत, असे या म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...