आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेवरील हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण; शहिदांना श्रद्धांजली देताना मनमोहन यांना भेटले मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आज संसदेवर हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत एकजूट दिसून आली. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप लावणारे नरेंद्र मोदी आणि मनमोहनसिंग एकमेकांना अभिवादन करताना दिसले. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष बनलेले राहुली गांधीही संसदेत पोहोचले आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर तेही सुषम स्वराज, रविशंकर प्रसाद यांच्यासह सरकारमधील अनेक नेत्यांची भेट घेताना दिसू आले. हल्ल्याच्या स्मृतिदिनी श्रद्धांजली देण्यासाठी सर्व दिग्गज नेतेमंडळी हजर असल्याने लोकशाही ताकद दिसून आली. तथापि, 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला सुरक्षा दलाने नाकाम केला होता. महिलेसमवेत 8 जवान शहीद झाले होते. 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

 

अडवाणी- सोनियाही संसदेत पोहोचले...
हल्ल्याच्या 16 व्या स्मृतिदिनी मोदी आणि राहुल यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री राजनाथ सिंग, सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते शहिदांना श्रद्धांजली देताना एकत्र उभे असल्याचे आढळले.
- हा क्षण यासाठी खास आहे कारण मंगळवारीच गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. यादरम्यान भाजप आणि काँग्रेसने एकमेकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली होती. यादरम्यान 'नीच विवाद', मंदिर, पाकिस्तान असे मुद्दे समोर आले होते. भाषिक बंधनेही तुटली.
- आता सर्व वादांच्या दरम्यान संसदेवर हल्ल्याच्या स्मृतिदिनी सर्व नेत्यांनी एकजूट दाखवून दिले की, भारतीय लोकशाहीच्या या मंदिरावर झालेल्या हल्ल्याला आम्ही विसरलेलो नाहीत.

 

केव्हा झाला होता हल्ला?
- 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दिल्ली पोलिसांतील 5 जवान, सीआरपीएफची एक महिला अधिकारी, संसदेतील दोन सुरक्षा रक्षक आणि एक माळी शहीद झाले होते.
- लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनरी संसदेत विस्फोट करून खासदारांना बंधक बनवण्याचा कट रचला होता. देशाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांचा कट उधळला होता.
- संसदेवर हल्ला झाला तेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा तब्बल 100 खासदार संसदेतच होते.
- यानंतर हल्ल्याचा मास्टरमाइंड अफझल गुरूला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अफझलला 9 फेब्रुवारी 2013 रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...