आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांचा लोकशाहीवर विश्वास नाही : भाजप, लोकशाहीला ते संपवू लागले आहेत : काँग्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार म्हणाले, सर्व पक्षांना आग्रह केला होता की सभागृहाचे कामकाज सकारात्मक चर्चेने होऊ द्या. - Divya Marathi
संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार म्हणाले, सर्व पक्षांना आग्रह केला होता की सभागृहाचे कामकाज सकारात्मक चर्चेने होऊ द्या.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होऊन ७ दिवस झाले. परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प आहे. मंगळवारीदेखील गोंधळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

 

काँग्रेससह विरोधी पक्षांनी पीएनबी घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सभागृहात भूमिका मांडावी, अशी मागणी लावून धरली. टीडीपी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीवर अडून होते. विरोधी पक्षाचे सदस्य अधिवेशनाच्या सुरुवातीपासून अर्थात ५ मार्चपासून गदारोळ करत आहेत.   


संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार मंगळवारी म्हणाले, सरकारने सभागृहाच्या कार्यसूचीमध्ये सर्व महत्त्वाच्या विषयांना समाविष्ट केले आहे. सर्व खासदारांसाठी आम्ही व्हीप जारी केला आहे, असे अनंत कुमार यांनी सांगितले. आम्ही काँग्रेस तसेच इतर पक्षांना सभागृह चालवू द्यावे, अशी विनंतीदेखील केली आहे. परंतु बहुधा सोनिया व राहुल गांधी यांचा लोकशाहीवर विश्वास नसावा. संसदेच्या बाहेर ते लोकशाहीबद्दल खूप बोलतात. सभागृहात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. काँग्रेसच्या जीन्समध्ये लोकशाहीच नाही, असा आरोप अनंत कुमार यांनी केला. दुसरीकडे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधारी भाजपवर लोकशाही संपवत असल्याचा घणाघाती आरोप केला. त्यावरून दोन्ही सदस्यांत पुन्हा जुंपली होती.

 

डिनर डिप्लोमसी २०१९ साठी २० पक्षांचे नेते अाले एकत्र

नवी दिल्ली।  काँग्रेसने भाजपविरुद्ध विराेधी पक्षांची माेट बांधण्यासाठी डिनर डिप्लाेमसीचा अाधार घेतला. त्यात २० पक्षांचे नेते सहभागी झाले. संयुक्त पुराेगामी अाघाडीच्या अध्यक्षा साेनिया गांधी यांनी मंगळवारी अाघाडीत सहभागी पक्षांच्या नेत्यांना भाेजनासाठी निमंत्रित केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्रा, अारजेडीचे तेजस्वी यादव, हम पक्षाचे जीतनराम मांझी, नॅशनल काॅन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे रामगाेपाल यादव, डीएमकेच्या कनिमाेझी, जेव्हीएमचे बाबुलाल मरांडी, शरद यादव अादींचा समावेश हाेता. या सर्व नेत्यांनी २०१९मधील निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन केले.

 

खासदारांनी सभागृहात पोस्टर दाखवू नये : नायडू 

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी खासदारांना सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कोणताही खासदार सभागृहात पोस्टर आणू शकत नाही. कारण हे नियमाच्या विरोधात आहेच. त्यातून सभागृहाची प्रतिमा मलिनही होते, असे नायडू म्हणाले.  

 

लोकसभेत २८, राज्यसभेत ३९ विधेयके पडून 

संसदेत ६७ विधेयके मंजुरीविना पडून आहेत. लोकसभेत २८ पैकी २१ विधेयके अधिवेशनातील अडथळ्यामुळे लटकली आहेत. उर्वरित सात विधेयके स्थायी समितीकडे आहेत. राज्यसभेत ३९ विधेयके लटकली आहेत. त्या ३९ पैकी १२ विधेयके लोकसभेत तर मंजूर झाली आहेत. मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.  

 

संसदेत ८ पक्षांचा सहा  मुद्द्यांवर गदारोळ

काँग्रेस, टीडीपी, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस,  आप, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, माकपच्या गदारोळामुळे कामकाज ठप्प झाले. या पक्षांच्या प्रमुख ६ मागण्या आहेत. त्यात बँक घोटाळा, सीलिंग, कावेरी मंडळ व्यवस्थापन, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा, पुतळ्यांची तोडफोड, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यांवर विरोधक आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...