आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन-आधार लिंक, 31 मार्चपर्यंत मुदत; तिसऱ्यांदा वाढवली तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्डला आधार क्रमांक जोडण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता ३१ मार्च २०१८ पर्यंत पॅन-आधार लिंक करता येईल. आधी शेवटची मुदत ३१ डिसेंबर होती. गुरुवारी केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले होते की सरकारी सेवा व योजनांसाठी आधार बंधनकारक करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली जाईल.  शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने सांगितले की, काही करदात्यांनी अद्याप पॅनला आधार लिंक केलेले नाही. त्यांच्या सुविधेसाठी मुदत वाढवली जात आहे. देशात ३३ कोटी पॅनधारक असून १३.२८ कोटी युजर आधारशी जोडलेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...