आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल 1.85 रुपये, तर डिझेल 1.36 रुपयांनी स्वस्त; मुंबईत इंधन महागच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सतत १३ व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट झाली आहे. दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोल २० पैशांनी घटून ७६.५८ रुपये झाले, तर डिझेलचा दर १५ पैशांनी घटला असून २२ मेनंतर पहिल्यांदा डिझेल ६८ रुपयांपेक्षा (६७.९५) कमी राहिला. १३ दिवसांत पेट्रोल १.८५ आणि डिझेल १.३६ रुपये लिटर स्वस्त झाले आहे. याआधी १४ ते २९ मेपर्यंत इंधनाच्या दरात वाढ सुरू होती. किमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या होत्या. २९ मे रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर ७९.६८ रुपये आणि डिझेलचा दर ६९.३१ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला होता. मुंबईत २९ मे रोजी पेट्रोल ८६.२४ रुपयांवर पोहोचले होते.


मुंबईत इंधन महागच
कोलकातामध्ये सोमवारी पेट्रोल ७९.२५ रुपये आणि डिझेल ७०.५० रुपये प्रतिलिटरने विक्री होत होते. मुंबईत पेट्रोल, डिझेलचे दर देशातील इतर भागांच्या तुलनेत जास्त होते. पेट्रोल ८४.४१ रुपये, तर डिझेल ७२.३५ रुपये प्रतिलिटर विक्री होत होते. दरम्यान, वाढलेल्या दराच्या तुलनेत इंधन स्वस्त झाल्याचा दर कमी असल्याचे तज्ञांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...