आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात : भारत-अफगानिस्तान पहिली कसोटी अविस्मरणीय, स्पोर्ट्समन स्पिरिट दिसले : मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी रविवारी रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' द्वारे 45व्या वेळी देशवासियांना संबोधित केले. मोदी या कार्यक्रमातून लोकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतात. तसेच ते लोकांच्या सूचना आणि अनुभवांचाही कार्यक्रमात समावेश करतात. मे महिन्यात मोदींनी जीवनात खेळांचे महत्त्व सांगत देशवासीयांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. फिटनेस कॅम्पेनला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला होता. 

 

खेळभावना महत्तावाची 

बेंगळुरूत अफगानिस्तान-भारत यांच्यातील ऐतिहासिक सामन्यानंतर भारताने विजयानंतर ट्रॉफी स्वीकारताना फोटोसाठी अफगाणिस्तानच्या टीमलाही आमंत्रित केले होते. अफगाणिस्तानची पहिली मॅच असल्याने हा सामना महत्तवाचा होता. त्यातून खेळभावना कशी असावी हे आपल्याला शिकायला मिळते. 


योगातून होते जोडण्याचे काम 
मोदी म्हणाले की, योग करताना संपूर्ण जग एकत्रित आल्याचे दिसले. सौदीत तर महिलांनीही काही सादरीकरणकेले. योगाने आता सीमा ओलांडत लोक जोडण्याचे काम केले आहे. लोकांनी हा उत्सव बनवला. लोकांनी नमो अॅपवर डॉक्टरांबाबत बोलण्यास सांगितले. डॉक्टर आपल्याला पुनर्जन्म देत असतात. ते आपल्या कुटुंबाचा एक भाग असतात, असे म्हणत मोदींनी 1 जुलैच्या डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...