आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या पापांची शिक्षा भोगताहेत देशवासी- मोदी;काँग्रेस व नेहरू-गांधी परिवारावर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला अत्यंत आक्रमकपणे उत्तर दिले. लोकसभेत दीड तास आणि राज्यसभेत १ तास ६ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी परिवारावर घणाघाती हल्ला चढवला. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी काळात विधानसभा निवडणूक असलेल्या कर्नाटक राज्याचाही उल्लेख केला. दुसरीकडे, नाराज असलेला मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीची स्तुती करून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले, देशाचे विभाजन करणे हे काँग्रेसच्या चारित्र्यातच आहे. तुम्ही लावलेली विषवल्ली, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही त्या पापाची शिक्षा १२५ कोटी भारतीय भोगत आहेत. भाषणादरम्यान मित्रपक्ष तेदेपासह विरोधी पक्ष हुकूमशाही चालणार नाही, धमकावणे बंद करा या घोषणा देत राहिले.

 

मोदी यांचा वार

- कॅबिनेटचा निर्णय फाडून टाकणाऱ्यांनी आम्हाला लोकशाहीचे धडे देऊ नयेत.  
- आधारचे व्हिजन वाजपेयी यांचे होते. बेनामी मालमत्ता कायद्याचेही श्रेय काँग्रेसने घ्यावे. अामची हरकत नाही.

 

राहुलचा पलटवार

दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींवर पलटवार केला. ते म्हणाले, पंतप्रधान बरेच काही बोलले. मात्र आम्ही िवचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलीच नाहीत.

 

नवा नव्हे, तुम्हाला तोच आणीबाणी, घोटाळ्यांचा भारत हवा आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली आणि तुम्हाला नवा भारत नको तर आणीबाणी आणि घोटाळ्यांचा भारत हवा आहे का, असा प्रतिप्रश्नही केला.

 

> काँग्रेस : मोदी सरकारच्या नव्या भारतात जातीय हिंसाचार, भय व अत्याचारांचा बोलबाला आहे. घटनात्मक मूल्यांवर हल्ला होतोय. असा नवा भारत नकोय. 

> माेदी : लोकशाही काँग्रेस आणि नेहरूंनी दिली नाही. तुमचे पदाधिकारी (राहुल गांधी) मीडियासमोर कॅबिनेटचा निर्णय फाडून फेकतात. कृपया आम्हाला लोकशाहीचे धडे शिकवू नका. तुम्हाला काय आणीबाणी, घोटाळे, शिखांच्या कत्तली करणारा भारत हवा आहे का?

 

> काँग्रेस : तरुण बेरोजगार आहेत. मोदींनी दरवर्षी २ कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. 

> मोदी : बेरोजगारीबद्दल बोलत असाल तर अवघ्या देशाचा आकडा घ्या. प. बंगाल, केरळ व पंजाब सरकारांनी १ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. देशाची दिशाभूल करू नका. तुम्ही फक्त स्वप्ने दाखवता. 

 

> काँग्रेस : काँग्रेस सरकारांच्या योजनांची नावे बदलून लागू केल्या जात आहेत. हे सरकार गेमचेंजर नाही नेमचेंजर आहे. 

> मोदी : आम्ही एमचेंजर आहोत. ध्येयाचा पाठलाग करतो आणि ते साध्य करूनच थांबू.  अनेक वर्षांपासून बंद पडलेले ९ लाख कोटींचे प्रकल्प सुरू केले. जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करणे हा आमचा स्वभाव नाही. 

 

 

> काँग्रेस : यूपीएने आधार योजना आणली. मोदी व भाजपने त्याला विरोध केला. आता त्याच आधारचा धूमधडाक्यात प्रचार व सक्ती केली जात आहे. 

> मोदी : आधारचे व्हिजन वाजपेयींचे होते. ७ जुलै १९९८ ला गृहमंत्री अडवाणींनी राज्यसभेत मल्टिपर्पज नॅशनल आयडेंटिटी कार्डाचा उल्लेख केला होता. काँग्रेसला आधारचे श्रेय देण्यास आडकाठी नाही. काँग्रेसने बेनामी मालमत्ता कायदा लागू केला नाही, त्याचेही श्रेय त्यांनीच लाटावे.

 

संसद उत्तर देण्याची जागा, काँग्रेसवर टीका करण्याची नव्हे
आपण विरोधी पक्षनेते नव्हे, पंतप्रधान आहोत हेच मोदी विसरले आहेत. संसद ही काँग्रेसवर टीका करण्याची नव्हे, उत्तर देण्याची जागा आहे. काँग्रेसवर तुम्ही जाहीर सभेमध्ये बोला. मोदींनी मधमाशी आणि बाबूंच्या गोष्टी केल्या. मात्र, शेतकऱ्यांना कर्ज किंवा कर्जमाफीवर काहीच भाष्य केले नाही. राफेल करार आणि रोजगार या मुद्द्यावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष (लोकसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना)

 

रामायणानंतर प्रथमच हे भाग्य लाभले : मोदी
मोदींनी आधार योजनेचा उल्लेख करताच काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या. यावर राज्यसभा सभापती नायडंूना मोदी म्हणाले, ‘सभापतीजी, माझी तुम्हाला विनंती आहे. रेणुकाजींना काही बोलू नका. रामायण मालिकेनंतर प्रथमच असे हास्य ऐकण्याचे भाग्य लाभले आहे.’ मोदींच्या या वक्तव्यावर सत्ताधारी सदस्यही जोरजोरात हसू लागले आणि रेणुका यांचे हास्य बंद झाले.

 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणले मोदी...

बातम्या आणखी आहेत...