आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलंदाज 90 वर हळु खेळू लागतो, FICCI ने असे करु नये; चौकार, षटकार मारा: मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे झालेल्या FICCI च्या भाषणात देश भ्रष्ट्राचार आणि काळा पैसा या प्रश्नांमुळे त्रस्त असल्याचे सांगितले.  नागरिकांना यापासून मुक्ती हवी आहे. फक्की सारख्या संघटना अथवा राजकीय पक्ष यांनी याबाबत चिंतन केले पाहिजे, देशवासियांच्या भावना लक्षात घेत पुढील रणनिती आखावी. 70 वर्षांपासून सामान्य माणूस या सगळ्या समस्यांचा सामना करत आहे. 

 

आम्ही भ्रष्ट्राचार नष्ट करत आहोत
- मोदी म्हणाले, लहान-लहान गोष्टींसाठी सामान्य माणसाला झगडावे लागते. बॅंक खाते, गॅस जोडणी, पेन्शन, स्कॉलरशीपसाठी कमिशन द्यावे लागत होते. सिस्टीम सोबत असलेले सामान्य माणसाचे हे युध्द संपविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पारदर्शक आणि संवेदनशील असलेली यंत्रणा उभारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांना समजुन घेणारी यंत्रणा आम्हाला उभारायची आहे. 

- जनधन योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. जेव्हा ही योजना सुरु केली. तेव्हा आम्ही लक्ष्य निर्धारित केले नव्हते. गरिबांसाठी किती बँक खाती उघडायची आहेत हे सुध्दा माहिती नव्हते. कारण यासाठी आवश्यक माहितीच सरकारकडे नव्हती.

- आम्हाला कळाले होते की गरिबांना बँका दरवाजातूनच परत पाठवतात. आता जेव्हा आम्ही पाहतो की 30 कोटी लोकांनी जनधन खाते उघडले आहे तेव्हा कळते की गरिबांचे किती मोठी गरज आम्ही पूर्ण केली आहे. 

- एका अभ्यासानुसार ग्रामीण भागात अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत. तेथे महागाईचा दरही कमी झाला आहे. गरिबांच्या जीवनात किती मोठा बदल या एका गोष्टीमुळे झाला आहे. 

 

लोकांच्या गरजांनुसार बनवल्या योजना
- मोदी म्हणाले, आम्ही लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार योजना बनवल्या. लोकांचे जीवन सुलभ बनविण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 

बातम्या आणखी आहेत...