आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPSC मेरिट लिस्टमध्ये छेडछाड करुन RSSच्या पसंतीचे अधिकारी नियुक्त करणार मोदी- राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पीएमओ हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. - Divya Marathi
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पीएमओ हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

नवी दिल्ली - सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कॅडर देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. हा प्रस्ताव म्हणजे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पसंतीचे अधिकारी मोक्याच्या पदांवर नियुक्त करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांनी मंगळवारी ट्विट करुन या प्रस्तावाविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, 'पंतप्रधान लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये छेडछाड करुन आरएसएसच्या पसंतीचे अधिकारी नियुक्त करण्याच्या विचारात आहे.' या ट्विटसोबत राहुल गांधी यांनी पीएमओचे पत्रही शेअर केले आहे.

 

विद्यार्थ्यांच्या अधिकारांवर गंडांतर आणत आहे आरएसएस 
- आरएसएस त्यांच्या पसंतीचे उमेदवार नियुक्त करण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या मेरिट लिस्टला धाब्याबवर बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. 
- ट्विटमध्ये राहुल म्हणाले, 'विद्यार्थ्यांनो उठा! तुमचे भविष्य धोक्यात आहे. आरएसएस तुमचे अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत दिलेले पत्र त्याचा खुलास करत आहे. मोदीजी मेरिट लिस्टनुसार नाही तर आरएसएसच्या पसंतीच्या अधिकाऱ्यांची केंद्रीय सेवांमध्ये निवड करु इच्छित आहे.'

 

काय आहे प्रस्ताव ? 
- पंतप्रधान कार्यालयाने संबधित खात्याला एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, की फाऊंडेशन कोर्स झाल्यानंतर सर्व्हिस अलॉट केली जाऊ शकते? सर्व सेवांच्या फाऊंडेशन कोर्सचा कार्यकाळ हा तीन महिने असतो. 
- सध्या नागरी सेवांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना फाऊंडेशन कोर्सच्या आधी सर्व्हिस अलॉट केली जाते. पंतप्रधान कार्यालयाने विचारले आहे, की फाऊंडेशन कोर्स नंतर कॅडर निश्चित केल जाऊ शकते का? 
- कार्मिक मंत्रालयाने वेगवेगळ्या कॅडरशी संबंधीत विभागांकडून हा प्रस्ताव लागू करण्यावर आपले व्यवहारिक पर्याय मागितले आहेत. त्यात विचारण्यात आले आहे, की फाऊंडेशन कोर्स आणि यूपीएससी परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्व्हिस आणि कॅडर निश्चित केले जावे? 
- यूपीएससी उत्तीरण उमेदवार हे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस याशिवाय रेव्हूणी सर्व्हिस, माहिती प्रसारण सेवा आणि इतर सेवांमध्ये अधिकाऱ्यांना अलॉट केले जाण्यावरही फिडबॅक मागवण्यात आला आहे. 
- सध्याच्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणांनुसार त्यांना कॅडर मिळत असते. त्यानंतर मसूरी (उत्तराखंड) येथील लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये त्यांचा तीन महिन्यांचा फाऊंडेशन कोर्स होतो. 

 

कॅडर मिळाल्यानंतर उमेदवारांमध्ये गांभार्य राहात नाही- सरकार 
- या संपूर्ण वादावर सरकारने तर्क दिला आहे, की उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना कॅडर मिळते. त्यानंतर फाऊंडेशन कोर्समध्ये ते गांभीर्याने सहभागी होत नाहीत. अनेक उमेदवार हे फेल होतात. त्यांना पुन्हा संधी दिली जाते. याशिवाय काही उमेदवार असे असतात जे आपला कॅडर सुधारण्याच्या कारणामुळे यात सहभागी होत नाही.
- केंद्र सरकारचे म्हणणे आहे की ट्रेनिंग आणि परीक्षा या दोन्हींच्या आधारावर कॅडर मिळाले तर उमेदवारांमध्ये गांभीर्य राहिल. 

बातम्या आणखी आहेत...