आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB फ्रॉड: नीरव मोदीचे 30 कोटी रुपये आणि इम्पोर्टेड वॉचचे 60 कंटेनर ED ने केले जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएनबी घोटाळा प्रकरणी ईडीने नवव्या दिवशी केलेल्या कारवाईत ब्रँडेड घड्याळे जप्त केली आहेत. - Divya Marathi
पीएनबी घोटाळा प्रकरणी ईडीने नवव्या दिवशी केलेल्या कारवाईत ब्रँडेड घड्याळे जप्त केली आहेत.
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) 11,356 कोटींटा घोटाळा करणारा नीरव मोदी याच्या मालमत्तांवर नवव्या दिवशीही कारवाई सुरु आहे. ईडीने शुक्रवारी नीरव मोदीचे 60 कोटी रुपये बॅलेंन्स असलेले बँक अकाऊंट सील केले आहे. त्यासोबतच ब्रँडेड आणि महागड्या घड्याळांनी भरलेले 60 कंटेनर जब्त केले आहेत. याआधी गुरुवारी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनीही कारवाई केली. त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) 2000 कोटी रुपयांपर्यंतच्या लोन डिफॉल्टर्सची यादी मागितली आहे. त्यासोबतच पीएनबी आणि गीतांजली जेम्स कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पीएनबीच्या उपमहाव्यवस्थापकांना समन्स जारी केला आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी याच्या गीतांजली ग्रुपवर कारवाई करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...