आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळा:एसआयटी चौकशीसाठी केंद्राचा विरोध;देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई- पंजाब नॅशनल बँकेतील ११,३९४ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्यास केंद्र सरकारने बुधवारी सुप्रीम कोर्टात विरोध केला. सीबीआय व इतर संस्था चौकशी करत आहेत. अनेक जणांना अटक झाली आहे. त्यामुळे इतर कोणत्या संस्थेमार्फत चौकशी वा तपासाची गरज नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले.


जनहित याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस जारी करण्यास नकार दिला. यावर सुनावणीत अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी या याचिकांना विरोध केला. याचिकाकर्ते वकील विनीत ढांडा यांनी केंद्राला नोटीस बजावल्याविना बाजू कशी ऐकून घेता येईल, असा प्रश्न केला. 

 

४ बोगस कंपन्यांसह १७ ठिकाणी छापे
पीएनबी घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी सातव्या दिवशीही छापे टाकले. मुंबईत चार बोगस कंपन्यांसह १७ ठिकाणी तपासणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...