आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराव्यांच्या शोधार्थ पोलिस पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी;मुख्य सचिवांना मारहाण प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना आपच्या आमदारांनी मारहाण केल्याप्रकरणी पुरावे मिळवण्यासाठी ६० पोलिसांचे पथक शुक्रवारी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले. सर्व २१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आली. तपासात २१ पैकी १४ सीसीटीव्ही कॅमेरेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले. ७ कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग बंद होती. विशेष म्हणजे ज्या खोलीत मुख्य सचिवांना मारहाण झाली त्या खोलीत कॅमेराच नव्हता. सीसीटीव्हीची वेळही ४० मिनिटे ४३ सेकंदाने मागे होती.

 

दिल्लीतील आप आमदारांचा जामीन  फेटाळला

प्रकाश मारहाणप्रकरणी आप आमदार अमानतुल्ला खान व प्रकाश जारवाल यांचा जामीन दिल्ली हायकोर्टाने फेटाळला. त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री निवासस्थानच्या झडतीत काय सापडले? 
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची जवळपास 1 तास चौकशी करण्यात आली. डीसीपी हरिंदर सिंह यांनी सांगितले की सीएम हाऊसमध्ये 21 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यापैकी 14 काम करत आहेत. त्यातील 7 चे रेकॉर्डिंग बंद आहे. जिथे मुख्य सचिवांना मारहाण झाल्याची माहिती आहे तिथे एकही कॅमेरा नाही. आम्ही संर्व 21 सीसीटीव्ही कॅमेरांचे रेकॉर्डिंग आणि हार्डि डिस्क जप्त केली आहे. 

- आधी अशी माहिती होती की पोलिस अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची चौकशी करणार आहे. मात्र पोलिसांनी याला नकार दिला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांनी सीएम हाऊसमधील स्टाफला बाहेर जाण्यास सांगितले होते. 

 

कारवाईवर केजरीवाल काय म्हणाले... 
- पोलिस चौकशीसाठी आले तेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवास्थानातून बाहेर गेले. 
- ते म्हणाले, 'जेवढ्या तातडीने या प्रकरणाचा तपास होत आहे त्याचा मला आनंद आहे. चौकशी झाली पाहिजे. मात्र तपास यंत्रणांना मला सांगायचे आहे की न्यायाधीश लोया प्रकरणी अमित शहांचीही चौकशी करण्याची हिम्मत दाखवा. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देईल.'
- याशिवाय केजरींनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले की 'दोन थप्पडचा आरोपात मुख्यमंत्री निवासस्थानाची झाडाझडती घेतली जात आहे. जज लोया यांच्या हत्येची चौकशी झाली पाहिजे की नाही.'
- केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील मंत्र्यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे.

बातम्या आणखी आहेत...