आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला भरतीसाठी पोलिसांनी मोहीम राबवावी : राजनाथ सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय पोलिस दलाने महिलांच्या भरतीसाठी विशेष मोहीम चालवली पाहिजे. त्यामुळे महिलांना सुरक्षा दलांत ३३ टक्के राखीव जागा देण्याचे उद्दिष्टाची पूर्तता करणे शक्य होऊ शकेल, असे आदेश गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे.  


गाझियाबादमध्ये केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाच्या ४९ व्या स्थापना दिन समारंभातील पथसंचलन कार्यक्रमात गृहमंत्री उपस्थित होते. संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. डेटा चोरी, हॅकिंग, सायबर गुन्ह्यांमुळे आैद्योगिक सुरक्षेच्या क्षेत्रासमोर नवीन आव्हाने आहेत. या बदलत्या परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून गृह मंत्रालयामध्ये अलीकडेच सायबर व माहितीची साठवण केली जात आहे.  


विमानतळ तसेच इतर प्रतिष्ठानांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आैद्योगिक सुरक्षा दलाची कामगिरी कौतुकास्पद आहे. प्रवाशांसोबत नम्र राहणे चांगली गोष्ट आहे. परंतु सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा योग्य नाही. कारण नम्र असणे आणि चौकस राहणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजनाथ म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था काही वर्षांत ५ खर्व डॉलरचा आकडा पार करेल. त्यामुळेच विमानतळ, मेट्रो तसेच जलदगती रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे. 

बातम्या आणखी आहेत...