आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाख टन साखरेच्या बफर स्टॉकची तयारी; राखीव साठ्यासाठी kg 30 रुपये दराची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाढते साखर उत्पादन आणि ऊस उत्पादकांची वाढती थकबाकी यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलली अाहेत. केंद्राने ३ लाख टन साखरेचा राखीव साठा करण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने अन्न मंत्रालयाने मसुदा तयार केला आहे. त्यानुसार साखर कारखानदारांना किलोमागे ३० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.   


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री  शरद पवार यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते.  साखरेचे विक्रमी उत्पादन आणि किमतीतील घसरण यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचे आवाहन पवार यांनी केले होते. त्यानुसार पंतप्रधान कार्यालय, सचिव समिती आणि अन्न मंत्रालयाने हा मसुदा तयार केला आहे.

 

त्यानुसार ३ लाख टन साखरेचा बफर स्टॉक प्रस्तावित आहे. त्यात साखर कारखानदारांना प्रति किलो ३० रुपयांच्या आसपास दर मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कारखान्याचा कोटा निश्चित करणे आणि मासिक वितरण पुन्हा सुरू करणे यांसारख्या बाबी या मसुद्यात आहेत.    
किरकोळ बाजारात साखर महागणार?  : सध्या साखर कारखानदारांना प्रति किलो साखरेसाठी २५.६० रुपये ते २६.२२ रुपये असा दर मिळतो आहे. प्रति किलो साखर उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा हा दर कमी आहे.

 

मसुद्यानुसार साखर कारखानदारांना प्रति किलो ३० रुपयांच्या आसपास दर मिळल्यास किरकोळ बाजारातील साखरेच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात सध्या साखरेचा दर प्रतिकिलो ३२ ते ३४ रुपये आहे. 

 

 प्रति किलो ३० रुपयांच्या आसपास दर मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कारखान्याचा कोटा निश्चित करणे आणि मासिक वितरण पुन्हा सुरू करणे यांसारख्या बाबी या मसुद्यात आहेत. 

  
किरकोळ बाजारात साखर महागणार?
सध्या साखर कारखानदारांना प्रति किलो साखरेसाठी २५.६० रुपये ते २६.२२ रुपये असा दर मिळतो आहे. प्रति किलो साखर उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा हा दर कमी आहे. मसुद्यानुसार साखर कारखानदारांना प्रति किलो ३० रुपयांच्या आसपास दर मिळल्यास किरकोळ बाजारातील साखरेच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात सध्या साखरेचा दर प्रतिकिलो ३२ ते ३४ रुपये आहे.   


थकबाकी २२ हजार कोटी रुपयांवर   
यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३१.६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. देशातील बाजारपेठांत २५ लाख टन साखरेची मागणी आहे. विक्रमी साखर उत्पादनामुळे साखरेचे दर कोसळले. त्यातून ऊस उत्पादकांची कारखान्यांकडील थकबाकी २२ हजार कोटींवर पोहोचली आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...