आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या विद्यार्थ्यांना टिप्स : परीक्षा सणासारख्या साजऱ्या करा; स्पर्धा स्वत:शीच करा अन् स्वत:पासूनच प्रेरणा घ्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. हा काळ काळजी, चिंतेचा नसून लढण्याचा आहे. या काळात विद्यार्थ्यांनी योद्ध्याप्रमाणे वागावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना टिप्स देणारे एक पुस्तक लिहिले आहे. मुलांसह शिक्षक, पालकांना याद्वारे प्रेरणा मिळू शकते. या पुस्तकाचे नाव ‘एक्झाम वॉरियर्स’ असे ठेवले आहे. 


या पुस्तकाचे प्रकाशन पेंग्विन पब्लिकेशनने केले आहे. २०८ पृष्ठांच्या पुस्तकाची किंमत ९० रुपये ठेवण्यात आली. शनिवारी नवी दिल्लीत याचे प्रकाशन झाले. प्रकाशन समारंभाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची उपस्थिती होती. परीक्षेच्या काळात तणाव घालवण्यासाठी मोदींनी काही मंत्र दिले आहेत. स्वराज म्हणाल्या, पंतप्रधानांची नाळ देशातील जनतेशी चांगल्या पद्धतीने जुळली आहे. ते चांगले वक्ते तर आहेतच, पण लोकांपर्यंत आपले म्हणणे कसे पोहोचवायचे याची कला त्यांना अवगत आहे. हे पुस्तक त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल. पुस्तकात मोदी म्हणतात, सणांची तयारी आपण काही दिवस आधीच सुरू करतो. त्याच पद्धतीने परीक्षेची तयारीही करायला हवी. तेव्हाच सणाप्रमाणे परीक्षेचा आनंदही साजरा करता येईल.

 

आपल्या कौशल्यावर लक्ष दिले गेले पाहिजे. पंतप्रधानांनी पुस्तकात सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. खेळताना सचिन नेहमी एका चेंडूवर लक्ष केंद्रित करत असल्याने त्याला यश मिळाले. पदावर असताना मुलांसाठी पुस्तक लिहिणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधान बनण्याआधी त्यांनी ज्योति-पुंज, सोशल हार्मनी व इंडियाज सिंगापूर आदी कथा लिहिल्या आहेत. 

 

‘एक्झाम वॉरियर्स’ होण्यासाठी पंतप्रधानांचा मंत्र...

- परीक्षा एखाद्या सणासारख्या आहेत. त्या सणासारख्याच साजऱ्या कराव्या. 
-  ज्ञान हेच स्थायी आहे, ते जतन करा.
- जर स्पर्धा करायचीच असेल तर ती स्वत:शीच करा. इतर कुणाशीही नव्हे.
- वर्तमानच सर्वस्व आहे, त्यातच जगा.
- स्वत:साठी प्रेरणा बना. नेहमी नकारात्मकतेपासून ४ हात दूरच राहा.
- खेळा, बागडा; त्यातूनच शिका.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...