आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - संजय लीला भंसाळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाबाबतचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांनी चित्रपटावर बॅन लावला आहे. या प्रकरणी 'पद्मावत'चे निर्माते सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. सेंसॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही अनेक राज्यांनी बॅन का लावला, असे याचिकेत म्हटले आहे. गुरवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
पद्मावती चित्रपटाबाबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. अनेक दिवस सेंसॉरच्या परवानगीसाठी हा चित्रपट रखडला. त्यानंतर 5 बदलांसह हा चित्रपट रिलीज करण्यास सेंसॉर बोर्डाने परवानगी दिली होती. त्यानुसार चित्रपटाच्या रिलीजसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. पण तरीही राजस्थानने हा चित्रपट रिलीज करणार नसल्याचे स्पष्ट करत चित्रपटावर बॅन लावला. त्यापाठोपाठ गुजरात आणि मध्य प्रदजेशातही चित्रपट बॅन झाला. सोमवारी हरियाणा सरकारनेही चित्रपट बॅन करण्याची घोषणा केली. त्यामुळे निर्मात्यांकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
IMAX 3D मध्ये रिलीज होणार पद्मावत
- पद्मावतचे निर्माते भन्साळी प्रोडक्शन आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने रविवारी सांगितले की फिल्म जगभरात एकाचवेळी IMAX 3Dमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगु या तिन्ही भाषांमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.
काय नुकसान होणार
- मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा हे मोठे राज्य आहेत. येथे फिल्म रिलीज झाली नाही तर त्याचा थेट परिणाम कलेक्शनवर होणार आहे. हे चारही हिंदी भाषिक राज्य आहेत आणि येथे मल्टीप्लेक्स आणि सिंगल थिएटरमध्ये फिल्म दाखवली जाणार होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रिलीजबद्दल कुठे काय आहे स्थिती..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.