आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर, सर्वप्रथम सिद्धेश्वर मंदिरात घेणार दर्शन; अनेक प्रचारसभा करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी शनिवारपासून कर्नाटक दौऱ्यावर आहेत. - Divya Marathi
राहुल गांधी शनिवारपासून कर्नाटक दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवार पासून चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या दौऱ्याची सुरुवात मंदिरापासून होणार आहे. राहुल येथील सिद्धेश्वर मठातही जातील. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक आहे. यानिमित्ताने राहुल गांधी अनेक प्रचारसभांनाही संबोधित करतील. याआधी गुजरातमध्ये त्यांनी 85 दिवसांमध्ये 27 मंदिरांत जाऊन देवदर्शन केले होते. 

 

दौऱ्याची सुरुवात मंदिरातून 
- राहुल गांधींचा दौरा शनिवारपासून सुरु होत आहे. कोप्पल जिल्ह्यातील हुलीगेमा मंदिरात ते जाणार आहेत. आज सायंकाळी ते सिद्धेश्वर मंदिरात जाणार आहेत. 
- सिद्धेश्वर मंदिर हे लिंगायत समाजासाठी श्रद्धेचे स्थान आहे. कर्नाटकमध्ये बहुसंख्येने लिंगायत समाज आहे. 
- बेल्लारी येथील होसपेट येथे राहुल गांधी एका यात्रेला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. येथे जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य त्यांना रिसेप्शन देणार आहेत. 
- शनिवारी राहुल यांच्या कोप्पल आणि कुकानुर येथे प्रचारसभा होणार आहेत. 

 

राहुल गांधी यांचे मंदिर पॉलिटिक्स 
- डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या आहेत. मागीलवेळी येथे काँग्रेसकडे 61 जागा होत्या. 16 जागा जास्त जिंकल्याने काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 
- काँग्रेसच्या प्रचारात त्यांची संपूर्ण टीम झोकून देत आहे. त्यांनी प्रचारासाठी नवी स्ट्रॅटिजी आखली आहे. 
- राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये 85 दिवसांच्या प्रचारादरम्यान 27 मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले होते. 

बातम्या आणखी आहेत...