आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंतप्रधानांच्या दीड तासांच्या भाषणानंतर राहुल गांधींनी सभागृहाबाहेर त्यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान सभागृहात एक तासापेक्षा जास्त बोलले. परंतू त्यांनी आमच्या तीन प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. हे पूर्णपणे राजकीय भाषण होते. ते फक्त काँग्रसवरच बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, 'मोदी विसरलेत की ते आता पंतप्रधान आहेत. त्यांनी आता प्रश्न विचारायचे नाही, तर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.'
आमचे तीन प्रश्न
- राहुल गांधी म्हणाले, आज आम्ही देशाच्या पंतप्रधानांचे भाषण ऐकायचे होते. आमचे दोन-तीन प्रश्न होते. एक होता आंध्र प्रदेशचा मुद्दा, तो आम्ही उपस्थित केला. दुसरा मुद्दा होता, राफेल डीलमध्ये काही तरी गडबड आहे. त्याचे उत्तर पंतप्रधानांकडून आपेक्षेत होते.
- आज ते एक तासापेक्षा जास्त बोलले मात्र राफेल बद्दल एक शब्द काढला नाही. त्यांचे संपूर्ण भाषण राजकीय होते. ते बंगालबद्दल बोलत होते, कर्नाटकबद्दल बोलत होते. मात्र ते रोजगारावर बोलले नाही. त्यांनी युवकांना दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याबद्दलही त्यांनी मौन बाळगले.
शेतकऱ्यांवरही शांत राहिले मोदी
- मोदी शेतकऱ्यांवरही काहीही बोलले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीवर काही बोलले नाही. शेतमालाच्या भावावर काहीही बोलले नाही. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेवरही त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. त्यांचे भाषण काँग्रेस, काँग्रेस नेते यांच्यावरच होते.
- देशासमोर तीन-चार प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे भविष्य कसे राहिल? युवकांना रोजगार केव्हा मिळेल? राफेल डीलमध्ये काय झाले? हे त्यांनी सांगितले पाहिजे होते. राफेलचा करार तुम्ही पॅरिसला जाऊन बदलला. त्यासाठी तुम्ही कॅबिनेटच्या संरक्षण समितीला विचारले होते का? होय किंवा नाही, याचे उत्तर मिळाले पाहिजे.
संरक्षण मंत्र्यांवर प्रश्नचिन्ह
- राहुल गांधी पुढे म्हणाले, 'संरक्षण मंत्री या डीलवर काही बोलत नाहीत. वायूदलाची सर्वात महत्त्वाची डील आहे. त्या म्हणतात आमचे सिक्रेट आहे आम्ही सांगणार नाही. शहीद आणि एअरफोर्सचे प्रकरण आहे, एक शब्द बोलत नाही. आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे.'
मोदी विरोधीपक्षाचे नेते नाही
- 'मोदी जी विसरले आहेत की ते पंतप्रधान आहेत. ते विरोधीपक्षाचे नेते नाहीत. ते काँग्रेसवर बोलले, ठिक आहे. मात्र ही (संसदेकडे इशारा करत) ती जागा नाही. तुम्ही सार्वजनिक सभा घ्या. मात्र येथे तुम्हाला देशाला उत्तर द्यावे लागेल. येथे तुम्हाला देशाला प्रश्न विचारायचे नाही तर उत्तर द्यायचे आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.