आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी RBI चा नव्हे RSS चा निर्णय, जिंकल्यास GST चे नियम बदलणार : राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलबुर्गी - राहुल गांधींनी मंगळवारी कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये व्यावसायिकांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी हा RBI, अरूण जेटली किंवा अर्थमंत्रालयाची नव्हे तर RSS ची आयडिया होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यासाठी नरेंद्र मोदींवर दबाव आणला होता. कर्नाटकमध्ये यावर्षी निवडणुका होत आहेत. याठिकाणी सध्या काँग्रेसचे सरकार आहे. राहुल गांधींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. राहुल गांधींनी जीएसटीचा उल्लेखही केला. 2019 मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर GST च्या नियमांत बदल केले जातील, असे राहुल म्हणाले. 


18% करणार जीएसटी 
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, सत्तेत आल्यानंतर GST च्या नियमांत बदल करून ही प्रक्रिया सोपी केली जाईल. केंद्र सरकारने काहीही तयारी न करता GST लागू करून देशातील 130 कोटी लोकांना आडचणीत टाकले. आम्हाला साधा सरळ GST लागू करायचा होता. आम्ही देशात एक टॅक्स लागू करण्याबरोबरच गरीबांना GST मधून सूटही देऊ. 
- राहुल पुढे म्हणाले, GST चा कमाल दर 18 टक्के असेल. सरकारने काँग्रेसच्या अटी मान्य केल्या नाही आणि GST चे दर पाच स्लॅबमध्ये ठेवले आहेत. 


BJP वर नवीन आरोप 
राहुल म्हणाले, भाजप सरकार घटना हाती घेण्याचा प्रयत्न करत आहे. RSS प्रत्येक संस्थेत आपले लोक असावे यासाठी प्रयत्न करत आहे. मोहन भागवत यांचे वक्तव्य हाच विचार दर्शवते. भागवत यांनी लष्कराच्या जवानांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. त्यांनी या वक्तव्यासाठी देशाकडे माफी मागायला हवी. लष्कराला जवान तयार करायला 6-7 महिने लागतात. पण संघाचे स्वयंसेवक 3 दिवसांत तयार केले जाऊ शकतात असे भागवत म्हणाले होते. त्यावर राहुल गांधींनी टीका केली. 


चार दिवसांच्या निवडणूक दौऱ्यावर होते राहुल गांधी 
- कर्नाटकमध्ये मे 2018 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. राहुल शनिवारी 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी कर्नाटकला पोहोचले होते. 
- राहुल गांघींनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक राज्यांत मंदिरांचे दर्शनही घेतले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...