आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोका-कोलाचा मालक सरबत विकत होता, मॅकडोनाल्ड ढाबेवाल्याने सुरू केली : राहुल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ओबीसी वर्गाची उपेक्षा केल्याचा आरोप केला. दिल्लीत पक्षाच्या ओबीसी (इतर मागास वर्ग) कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल म्हणाले की, भारतात अशी परिस्थिती बनवली आहे की जो काम करतो तो मागे राहतो आणि फायदा दुसराच घेऊन जातो.

 

राहुल म्हणाले,‘युवकांना कौशल्य शिकवायचे असे मोदीजी म्हणतात; पण वस्तुस्थिती ही आहे की देशात कौशल्याची कमतरता नाही. ओबीसींकडे कौशल्याची कमतरता नाही. फक्त त्यांच्या कौशल्याला सन्मान मिळत नाही. भाजपत ओबीसींचे म्हणणे ऐकले जात नाही, पण काँग्रेसमध्ये सर्वांना सन्मान दिला जातो.’ राहुल म्हणाले-एक वर्षांत मोदीजींनी उद्योगपतींना २.५ लाख कोटी रुपये दिले आहेत, पण शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला नाही. त्यांची कर्जमाफी होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले-‘कोका-कोला कंपनी कोणी सुरू केली होती हे तुम्ही मला सांगा. कोण होते ते? कोणाला माहिती आहे? मी सांगतो कोण होते. कोका-कोला कंपनी सुरू करणारा माणूस सरबत विकणारा होता. तो अमेरिकेत सरबत विकत होता.

 

पाण्यात साखर मिसळत होता. त्याचा अनुभव, कौशल्याचा आदर झाला. पैसे मिळाले आणि कोका-कोला कंपनी स्थापन झाली. मॅकडोनाल्ड कंपनी कोणी सुरू केली हे कोणी सांगू शकता का? तो ढाबा चालवत होता. तुम्ही भारतात मला तो ढाबेवाला दाखवा, ज्याने कोका-कोला कंपनी स्थापली. कुठे आहे तो?’ राहुल यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याचे कारण म्हणजे कोका-कोला कंपनीच्या इतिहासाची चुकीची माहिती देणे आणि दोन्ही कंपन्या मिक्स करणे.  

 

राहुल म्हणाले, मोदी सरकारमुळे १५-२० लोकांचाच फायदा

- जे कारागीर आहेत, जे काम करतात त्यांना या देशात काही मिळत नाही. आमच्या लोकांना बँकेचे आणि राजकारणाचे दरवाजे बंद आहेत.

- शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ते दिवसभर काम करतात. परंतु मोदी सरकारला त्यांची कदर नाही.

- भाजपची रणनीती साफ आहे. संपूर्ण फायदा १५-२० लोकांना होतो. त्यात ओबीसी, शेतकरी व आदिवासींना काही मिळत नाही.

 

पुढील स्‍लाइडवर...वास्‍तव: कोका-कोला कंपनी पेय तयार करणाऱ्याची  नव्हे तर अॅटलांटाच्या फॉर्मिस्ट जॉनची...

 

बातम्या आणखी आहेत...