आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा आजपासून दोन दिवसीय अमेठी दौरा, पोस्टरमध्ये युवराज 'राम' तर मोदी 'रावण'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर त्यांच्या अमेठी मतदारसंघात जात आहेत. पक्षाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर राहुल प्रथमच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दौऱ्यावर जात आहेत. राहुल यांच्या दौऱ्यापूर्वी येथील गौरीगंजमध्ये पोस्टर लावले गेले आहे. या पोस्टर्समध्ये राहुल गांधींच्या हातात धनुष्य बाण दिसत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी 10 डोक्यांसह रावणाच्या रुपात दिसत आहे. तसेच पोस्टरमध्ये लिहिले आहे, भगवान रामाचे अवतार, 2019 मध्ये येणार राहुल राज रामराज. 


पक्ष मजबूत करणार.. 
- उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने राहुल गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीचा दौरा करत आहेत. गुजरातमध्ये पक्ष मजबूत केल्यानंतर राहुल गांधी आता उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- उत्तर प्रदेश विधानसभेत 403 मतदारसंघ आहेत. 2017 च्या विधानसभा निवजणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. 


2004 मध्ये प्रथमच बनले होते अमेठीचे खासदार 
राहुल गांधी प्रथमच 2004 मध्ये अमेठीचे खासदार बनले होते. त्यानंतर राहुल गांधी उत्तर प्रदेशबरोबरच देशभरातील राजकारणात सक्रीय झाले. सध्या राहुल गांधींचे संपूर्ण लक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत आहे. ।


दिसेबरमध्ये बनले पक्षाध्यक्ष 
राहुल गांधी (47) 11 डिसेंबरला काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. नरेंद्र मोदींनीही राहुल गांधींनी ट्वीट करून शुभेच्छा दिल्या होत्या. राहुल गांधी हे पक्षाध्यक्ष बनणारे गांधी नेहरू कुटुंबातील 6 वे तर काँग्रेसचे 60 वे सदस्य आहेत. पण पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताच त्यांना गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पराभवाचा सामना करावा लागला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...