आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Minister Piyush Goyal Order To Increase Security In The Railway Hacking Case

रेल्वेचे आरक्षण हॅकप्रकरणी सुरक्षा वाढवण्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संगणक प्रोग्रामरने रेल्वे विभागाची आरक्षण प्रणाली हॅक केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे माहिती विभागाला सायबर सुरक्षा प्रणाली मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. 


सीबीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात कार्यरत माजी कर्मचारी अजय गर्गने बनावट सॉफ्टवेअरद्वारे नवी आरक्षण प्रणाली सुरू केली होती. गर्ग हा पूर्वी रेल्वे विभागाच्या केटरिंग सेवेत कार्यरत होता. गर्गने तयार केलेल्या बनावट प्रणालीद्वारे शेकडो तत्काळ तिकिटे आरक्षित करणे शक्य होते. एकाच क्लिकवर हे तिकीट आरक्षित होते. एजंटला त्याने ही प्रणाली विकण्याचा धंदा सुरू केला होता.  


अवैध तिकीट आरक्षणाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे रेल्वे विभागाने सांगितले आहे. गर्गसारखे आणखी किती लोक या धंद्यात गुंतले आहेत याची सखोल चौकशी करण्याचे आदेश गोयल यांनी दिले. आरक्षणासाठी काम करणाऱ्या एजंटची चौकशीदेखील करण्यात येत आहे. हे बुकिंग  बिटकॉइन आणि हवाला माध्यमातून होत आहे. आतापर्यंत १० एजंटांचा छडा लावला असल्याचे सीबीआयने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...