आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेसाठी भाजपकडून राणे, जावडेकर, मुरलीधरन तर कॉग्रेसकडून कुमार केतकर रिंगणात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा साेमवारी अखेरचा दिवस अाहे. भाजपच्या काेट्यातील तीन जागांसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे व केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांची नावे निश्चित करण्यात अाली. तर काँग्रेसच्या एकमेव जागेसाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला अाहे. रविवारी रात्री त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात अाली. यापूर्वी शिवसेनेकडून अनिल देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण या विद्यमान खासदारांनी अर्ज दाखल केले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...