आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटोमॅक पेनचे मालक कोठारी पिता-पुत्राला अटक; बँकांचे 3,695 कोटी बुडवल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी व त्याचा मुलगा राहुल यांना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केली. सात बँकांचे ३,६९५ कोटी रुपये बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सलग चार दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. गुरुवारीही सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली. मात्र, तपासात सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. 

 

गीतांजली समूहाच्या सेझला सील 
पीएनबी घोटाळ्यात प्राप्तिकर खात्याने गीतांजली समूहाच्या हैदराबादेतील १,२०० कोटी रुपयांच्या एसईझेडला सील केले. ईडीने गुरुवारी नीरव मोदींच्या लक्झरी कार, शेअर, म्युचुअल फंडसह सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...