आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेच्या उपायांचे पालन होत नाही; पंतप्रधान मोदींची मन की बात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या ४१ व्या कार्यक्रमात विज्ञान दिन, महिला दिन व होळीबाबत संवाद साधला. मोदी म्हणाले,‘नैसर्गिक संकटांव्यतिरिक्त अनेक दुर्घटना आपल्या चुकीमुळे होतात. जगातील देशांनी आपत्ती व्यवस्थापनासाठीही संयुक्त सराव करायला हवा. रस्ते आणि कार्यक्षेत्रात सुरक्षेशी संबंधित उपाय लिहिलेले असतात, पण त्यांचे पालन कुठेच होत नाही.’ 

 

मोदींनी विज्ञान, तंत्रज्ञान, महिलांचा केला उल्लेख​....
लोकहितास्तव व्हावा तंत्रज्ञानाचा वापर

मोदी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानव कल्याण आणि मावन जीवनाची सर्वोच्च उंची गाठवण्यासाठी व्हावा. त्याचा वापर दिव्यांगांचे जीवन सोपे करण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी व्हावा.


सबळ महिला हे नवीन भारताचे स्वप्न
मोदी म्हणाले की, सशक्त, सबळ आणि देशाच्या समग्र विकासात बरोबरीची भागीदार महिला हेच नवीन भारताचे स्वप्न आहे. देश महिला विकासापेक्षा पुढे जाऊन महिला नेतृत्वाकडे जात आहे.


शेणापासून मिळवावा पैसा
मोदींना कचऱ्यापासून ऊर्जा तयार करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, शेणापासून पैसे मिळवण्यासाठी ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. तो शेतकऱ्यांना खरेदीदारांशी जोडेल. त्यांना योग्य दर मिळेल.


एक प्रश्नामुळे मिळाला महान वैज्ञानिक
मोदींनी भारतरत्न सर सी. व्ही. रमण यांची आठवण काढली. ते म्हणाले, नदी किंवा समुद्रातील पाण्याला रंग कसा मिळतो, यावर आपण कधी विचार केला आहे का? याच प्रश्नाने १९२० च्या दशकात भारताच्या एका महान वैज्ञानिकाला जन्म दिला.


४८ वर्षांच्या विकासाची तुलना ४८ महिन्यांशी करा : मोदी  
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच पुद्दुचेरीला आले. इथे त्यांनी आध्यात्मिक गुरू श्री अरविंद यांच्या अाश्रमात जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर एका सभेत मोदी म्हणाले, हे दिव्य लोकांचे शहर आहे. पुद्दुचेरीजवळ स्रोतांची कमतरता नाही. मात्र तरीही येथे विकास झालेला नाही. काँग्रेसवर हल्ला करताना ते म्हणाले, एका कुटुंबाने देशावर ४८ वर्षे राज्य केले, गेल्या १० वर्षांत तर रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. आमच्या सरकारला मे महिन्यात ४८ महिने पूर्ण होतील. विकासाच्या दृष्टीने त्यांच्या ४८ वर्षांशी तुलना करा, तेव्हा कळेल तुम्ही काय गमावले ते. आपणास १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. आपल्यासोबत स्वतंत्र झालेल्या जगातील अन्य देशांशी आपण विकासात बरोबरी करू शकलो नाही.  

बातम्या आणखी आहेत...