आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नेत्यामुळे झाला होता नसबंदी निर्णय; कार्यकर्त्यांनी लोकांची धरपकड करून आणले होते शिबिरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नुकतेच नोटबंदीला वर्ष पूर्ण झाले. हजार-पाचशेच्या नोटा, दोन हजारांची नोट, बँक-एटीएम कॅशलेस, देश कतार में, असे सगळे शब्द लोकांच्या अंगवळणी पडले. मोदींनी जाहीर केलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची तुलना काहींनी 1975 मधील आणीबाणीसोबतही केली आहे. आणीबाणीतही असाच एक बंदीचा निर्णय झाला होता. तो निर्णय होता नसबंदीचा!

 

> आज संजय गांधी यांची जयंती आहे. अकाली निधन झालेल्या या नेत्याने आईच्या (इंदिरा गांधी पंतप्रधान असताना) राज्यात मनमानी आणि हुकूमशाही निर्णय घेतले होते. याची काँग्रेसनेच कबुली दिली होती 'द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द नेशन' या पुस्तकात.
> काँग्रेसला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पक्षाच्या इतिहासाचा लेखाजोखा यात मांडण्यात आला होता. या पुस्तकात आणीबाणीच्या काळात नसबंदी आणि झोपड्या हटवण्याच्या निर्णयासाठी संजय गांधी यांनाच जबाबदार धरण्यात आले होते.

> आज ज्याप्रमाणे नोटबंदीचे देशातील मोठा वर्ग स्वागत करत असल्याचे सांगितले जाते आहे. तसेच 'द काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द नेशन' पुस्तकात सुरुवातीला देशातील मोठ्या वर्गाने आणीबाणीचे स्वागत केल्याचे म्हटले होते, मात्र नंतर संजय गांधी यांचे मनमानी निर्णयांना जनता वैतागली. देशाला विकासाकडे न्यायचे असेल तर लोकसंख्या नियंत्रित असली पाहिजे, असे सांगून संजय गांधींनी नसबंदी अनिवार्य केली होती. त्यासोबतच झोपडपट्टयांची सफाईचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच त्यांनी हुंडाविरोधी उपाय आणि साक्षरतेचाही प्रयत्न केला होता.

> मात्र त्यांनी हे सर्व निर्णय मनमर्जीने आणि हुकूमशाही पद्धतीने लागू केल्यामुळे पुढे काँग्रेसला त्याची मोठी परतफेड करावी लागली होती. कदाचित यामुळेच काँग्रेस आता संजय गांधींपासून अंतर ठेवून असते. त्याचे दुसरे कारण त्यांची पत्नी मनेका आणि मुलगा वरुण हे भाजपमध्ये आहेत, हेदेखील असू शकते.


पुढील स्लाइडमध्ये पाहा, संजय गांधींचे दुर्मिळ फोटो...

बातम्या आणखी आहेत...