आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवलेल्या आणि शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला कसे काय राजकीय पक्षाचे प्रमुख होता येते? असा सवाल केला आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की जी व्यक्ती स्वतः निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्यात आली आहे ती कशी काय उमेदवार निवडू शकते? सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे. त्यासाठी त्यांना तीन आठवड्याची मुदत दिली आहे. पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे.
हॉस्पिटल - शाळा चालवणे वेगळे आणि देश चालवणे वेगळे
- सरन्याधीश म्हणाले हे गंभीर प्रकरण आहे. कोर्टाने आधी आदेश दिला होता की निवडणुकीच्या शुद्धतेसाठी राजकारणातील भ्रष्टाचार संपवला गेला पाहिजे. कारण असे लोक एकटे काही करु शकत नाही. त्यासाठी ते संघटन उभे करतात आणि संघटनेच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करुन घेतात.
- कोर्ट म्हणाले, की एखादी शाळा किंवा हॉस्पिटल चालवणे यात काही गैर नाही मात्र जेव्हा देशाची धूरा सांभाळण्याचा विषय येतो तेव्हा प्रकरण वेगळे असते. हे आमच्या आधीच्या निर्णयाच्या विरोधात आहे.
कोर्टाचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय
मागून धडक दिली तर तो दोषीच असेल असे नाही
- रस्ते अपघातात वाहनाला मागून धडक देणारे वाहनाचा चालक दोषी ठरवला जातो. मात्र आवश्यक नाही की नेहमी त्याचीच चूक असेल. अपघाताची कारणे आणि पुरावे आणि परिस्थिती यावरही लक्ष देण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने रस्ते अपघातातील एका प्रकरणात हा निर्णय दिला.
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने टँकरने मागून धडक दिल्याच्या प्रकरणात कार ड्रायव्हरच्या निष्काळजीपणाला दोष दिला आहे. या प्रकरणात पंजाब-हरियाणा हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
- कोर्टाने दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या मुलांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.