आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मावत’वरील बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती;25 जानेवारीला होणार सिनेमागृहांत दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’  चित्रपट देशभर सिनेमागृहांत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने या चित्रपटावर चार राज्यांत घातलेल्या बंदीविरुद्ध निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना या बंदीला स्थगिती दिली आहे. यानुसार २५ जानेवारीला हा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. ‘बँडिट क्वीन’सारखे चित्रपट संपूर्ण विचाराअंती यापूर्वी प्रदर्शित होऊ शकले असताना ‘पद्मावत’वरील बंदी योग्य ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले.


निर्माता वायकॉम-१८च्या वतीने चित्रपटावर टाकण्यात आलेल्या बंदीविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निकाल देताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राज्यांनी टाकलेल्या बंदीला स्थगिती दिली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांनी ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घातली होती.


‘बंदी न पटणारी’
हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर या प्रकारे बंदी घातली जात असेल तर ते सद््सद््विवेकबुद्धीला पटणारे नाही, असे सरन्यायाधीश मिश्रा म्हणाले. त्यामुळे चार राज्यांनी घातलेली बंदी घटनाबाह्य ठरते, अशी टिप्पणी त्यांनी केली.

 

सुप्रीम कोर्टातील सुनावणीचे महत्त्वाचे मुद्दे
- देशभरामध्ये 25 जानेवारी रोजी 'पद्मावत' चित्रपट रिलीज करण्याचा मार्ग मोकळा. 
- ज्या राज्यांनी 'पद्मावत' चित्रपटांवर बॅन करण्याच्या अधिसूचना काढाल्या आहेत. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. 
- इतर राज्यांनी या चित्रपटाविरोधात अशा प्रकारच्या अधिसूचना काढण्यासही मनाई करण्यात आली. 
- राज्यांना चित्रपट प्रदर्शनादरम्यान कायदा व सुव्यवस्था पाळणे बंधनकारक असल्याचे निर्देश.

 

 

या प्रकरणी 'पद्मावत'च्या निर्मात्यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात दाव घेतली होती. सेंसॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही अनेक राज्यांनी बॅन का लावला, असे याचिकेत म्हटले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. पद्मावती चित्रपटाबाबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. अनेक दिवस सेंसॉरच्या परवानगीसाठी हा चित्रपट रखडला. त्यानंतर 5 बदलांसह हा चित्रपट रिलीज करण्यास सेंसॉर बोर्डाने परवानगी दिली होती. त्यानुसार चित्रपटाच्या रिलीजसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. पण तरीही राजस्थानने हा चित्रपट रिलीज करणार नसल्याचे स्पष्ट करत चित्रपटावर बॅन लावला. त्यापाठोपाठ गुजरात आणि मध्य प्रदजेशातही चित्रपट बॅन झाला. सोमवारी हरियाणा सरकारनेही चित्रपट बॅन करण्याची घोषणा केली. त्यामुळे निर्मात्यांकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अखेर गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने भाजप सरकारला धक्का देत चित्रपट प्रदर्शित करण्याचे आदेश दिले. 


IMAX 3D मध्ये रिलीज होणार पद्मावत
- पद्मावतचे निर्माते भन्साळी प्रोडक्शन आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने रविवारी सांगितले की फिल्म जगभरात एकाचवेळी IMAX 3Dमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगु या तिन्ही भाषांमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांनी केलेले चित्रपटाचे समिक्षण.. 

बातम्या आणखी आहेत...