आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SC Sought Response From CBI, NIA, Maha, And Karnataka Govt In Kalburgi Murder Case

कलबुर्गी हत्या : महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आणि NIA-CBI कडून सुप्रीम कोर्टाने मागवले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एम एम कलबुर्गी यांच्या हत्ये प्रकरणी सुप्रीम कोर्टाने NIA, CBI य तपास संस्थांसह  महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून उत्तर मागवले आहे. या प्रकरणाच्या चौकशी संदर्भातील याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. प्रसिद्ध लेखक एम.एम.कलबुर्गी यांची 2015 साली गोळ्या गालून हत्या करण्यात आली होती.  


कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी कलबुर्गी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस चौकशी झाली नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. तसेच या प्रकरणाची  या प्रकरणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि जस्टीस ए.एम.खानविलकर आणि डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठाने सुनावणी केली. त्यावेळी NIA, CBI य तपास संस्थांसह महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने या प्रकरणी सहा आठवड्यांत उत्तर द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 


हम्पी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू असलेले एम.एम.कलबुर्गी हे प्रसिद्ध विचारवंत होते. त्यांना 30 ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या धारवाडमध्ये अशलेल्या त्यांच्या घरी गोळ्या झाडून ठार करण्यात आले होते. कलबुर्गी हे विजयपुरा येथील यारागल गावात 1938 साली जन्मलेले होते. साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...