आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाचा बंडखोर गट नवीन पक्ष स्थापणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाचा (जदयू) बंडखोर गट आपल्याला नवीन पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लवकरच निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करणार आहे.  


जदयूचे माजी सरचिटणीस आणि शरद यादव यांचे जवळचे सहकारी अरुणकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही एक-दोन दिवसांतच निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करणार आहोत. तसेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा निवडणूक निकाल १८ डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर पक्षाचे अधिवेशन बोलावणार आहोत. नव्या पक्षासाठी समाजवादी जनता दल किंवा लोकतांत्रिक जनता दल या नावांची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.  निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात बाण या निवडणूक चिन्हाची मागणी करणारा शरद यादव यांच्या गटाचा दावा फेटाळून लावला होता. तेव्हा गुजरात निवडणुकीनंतर आम्ही नवीन पक्षाची स्थापना करू, अशी घोषणा या गटाने केली होती.  निवडणूक आयोगाने अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा संयुक्त जनता दल म्हणून मान्यता दिली होती.

बातम्या आणखी आहेत...