आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोपियां फायरिंग: आर्मी मेजरचे वडील FIR रद्द करण्यासाठी SCत, म्हणाले- काश्मीरमधील ड्यूटी अवघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उग्र जमावाने आर्मी जवानांवर दगडफेक केली होती. (फाइल) - Divya Marathi
उग्र जमावाने आर्मी जवानांवर दगडफेक केली होती. (फाइल)

नवी दिल्ली - काश्मीरमधील शोपियां येथे उग्र जमावावर फायरिंग केसमध्ये हत्येचे आरोपी आर्मी मेजर आदित्य कुमार यांच्या वडिलांनी   एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, की फक्त आर्मीच्या जवानांना वाचवण्यासाठी फायरिंग करण्यात आले होते. त्याआधी उग्र जमावाने रस्ता सोडावा अशी वॉर्निंगी दिली गेली होती. जेणे करुन आर्मी जवानांना सुरक्षित नेता येईल. सध्याच्या स्थितीत काश्मीरमध्ये ड्यूटी करणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे ही केस मागे घेण्याची ऑर्डर देण्यात यावी. 

 

बदल्याच्या भावनेने FIR मध्ये नाव 
- लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंह म्हणाले, '10 गढवाल रायफल्सचे मेजर आणि माझा चिरंजीव मेजर आदित्य कुमार यांचे नाव या केसमध्ये बदल्याच्या भावनेने गोवण्यात आले आहे. आर्मीचा एक थापा शोपियां येथे आपल्या ड्यूटीवर निघाला होता. त्यांना दगडफेक करणाऱ्या उग्र जमावाने घेराव टाकला. दगडफेकीत आर्मीच्या वाहनांचेही नुकसान झाले.'


- 'मेजर आदित्य कुमार यांच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात दाखक याचिकेत म्हटले आहे, की माझा मुलगा आपल्या सहकाऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी गेला होता. या दरम्यान आर्मी जवानांना मार्ग मोकळा करुन देण्यासाठी फायरिंग करण्यात आले होते. दगडफेक करणाऱ्यांना कित्येकवेळा मार्ग मोकळा करण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर तिथून जाण्यासाठी वॉर्निंग देण्यात आली.'

 

जमावाला पिटाळण्यासाठी फायरिंग 
- याचिकेत म्हटल्यानुसार, रस्त्यावर बेकायदेशीर जमाव झाला होता. तो अतिशय उग्र होता. त्यांनी एका जेसीओला बेदम मारहाण करुन मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी फायरिंग करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...