आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत एक्स्प्रेससमोर रेल्वे इंजिनने 7 जणांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू; सर्वांचे वय 18-20 वर्षे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हापुड (उत्तर प्रदेश) - रेल्वेरुळ ओलंडत असताना अचानक रेल्वे इंजिन आल्याने त्याखाली चिरडून 6 मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हापुड येथील पिलखुवा रेल्वेस्टेशनवर घडली आहे. 

 

केव्हा आणि कसा झाला अपघात 

दिल्लीहून फैजाबादला जाणारी पद्मावत एक्स्प्रेस हापुड येथील पिलखुवा स्टेशनवर उभी होती. रात्री साधारण 9 वाजता काही प्रवाशी रेल्वेरुळ ओलांडत असताना अचानक एका ट्रॅकवर रेल्वे आली आणि तेव्हाच काही प्रवाशांनी पद्मावत उभी असलेल्या ट्रॅकवर उडी घेतली. त्याचवेळी दुसऱ्याबाजूने रेल्वे इंजिन वेगात येत होते आणि 7 जण त्याच्याखाली आले. यातील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. 

- मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे 18 ते 20 वर्षे वयाचे तरुण होते. विशेष म्हणजे हे सर्वजण मित्र होते. ते सर्वजण पेंटिंगचे काम करायाचे. पेंटिंगच्या कामानिमित्त ते हैदराबादला निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...