आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशात पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू; पूर आेसरला, दिल्लीत धूळवादळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला / नवी दिल्ली - ईशान्य तसेच उत्तरेकडील काही राज्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासांत हिमाचल प्रदेशात पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत दोन पर्यटकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. हिमाचल-उत्तराखंड सीमेवर तीन तरुण वाहून गेले. मृतांत महाराष्ट्रातील बदलापूरचा ट्रेकर हर्षद आपटेचाही समावेश आहे. दुसरीकडे पंजाब, हरियाणात गारव्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. लवकरच पावसाचे आगमन होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

  
हिमाचल प्रदेशात गेल्या काही तासांत वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला. त्यानंतर राज्यातील विमानसेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या दुर्घटनांत सात जणांचा मृत्यू झाला. या हंगामातील पहिल्या पुराने आतापर्यंत सात बळी घेतले आहेत. पुराचा फटका सुमारे ४. २५ लाख लोकांच्या जीवनमानावर झाला आहे. दक्षिणेकडील आसाममध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील कोपिली, कुशीयारा इत्यादी प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आसाममधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्याला वेग आला आहे. निर्वासितांच्या छावण्यात अनेक लोकांनी आश्रय घेतला आहे. पूर पीडित सुमारे एक लाख लोकांना  १९१ छावण्यांत व्यवस्था करण्यात आली आहे.  


मिझोराम, त्रिपुरातील स्थिती सुधारली : गेल्या काही दिवसांपासून मिझोराम व त्रिपुरात पूरस्थिती आहे. परंतु शनिवारी दोन्ही राज्यांतील स्थितीत काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले. मिझोराममध्ये ट्लाँग नदीची पातळी कमी झाल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र लुंग्लेई जिल्ह्यात पुरात अडकलेल्या ५०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्रिपुरात ४० हजारावर लोक १८९ छावण्यांत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दल, आसाम रायफल्स, त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या सैनिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्यापक बचाव मोहिम राबवली. अजूनही काही भागात पाणीच पाणी आहे. लोक तराफे करून  सुरक्षित ठिकाणी जात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...