आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांना पाहताक्षणीच प्रेमात पडले होते राजीव गांधी, हरिवंशराय बच्चन यांनी केले होते कन्यादान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज जन्मदिवस आहे. सोनिया गांधी यांचा जन्म इटलीतला, पण आता त्या पूर्णपणे भारतीय झाल्या आहेत. या दोघांचे लग्न झाले तेव्हा सोनियांच्या कुटुंबातील कोणीही लग्नाला उपस्थित नव्हते. सोनियांचे कन्यादान गांधी घराण्याचे कौटुंबिक मित्र प्रसिद्ध कवी व अमिताभ बच्चन यांचे वडील दिवंगत हरिवंशराय बच्चन यांनी केले होते.
 
सोनिया गांधींच्या जन्मदिनानिमित्त divyamarathi.com सांगत आहे, सोनिया आणि राजीव यांच्या प्रेमाबद्दल फारशा उजेडात न आलेल्या गोष्टी.
 
राजीव आणि सोनिया यांची भेट झाली ते वर्ष होते 1965. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर सोनिया आणि राजीव यांचे लग्न झाले. 1968 च्या जानेवारीच्या थंडीत सोनिया प्रथमच भारतात आल्या. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांना घेण्यासाठी राजीव गांधींचे बालपणीचे मित्र आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन गेले होते. 25 फेब्रुवारी रोजी सोनिया आणि राजीव यांचे लग्न झाले, तोपर्यंत त्या बच्चन कुटुंबियाच्या घरी राहिल्या होत्या.
 
तेजी बच्चन यांनी मुलीसारखे सांभाळले होते सोनियांना
राजीव आणि सोनिया यांच्या तीन वर्षांच्या डेटिंगनंतर 1968 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. भारतात आल्यानंतर लग्नापर्यंत त्या बच्चन कुटुंबासोबत राहिल्या. अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन आणि राजीव गांधींच्या आई इंदिरा गांधी या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुलाच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले.
 
अमिताभ यांच्या आई-वडिलांनी केले कन्यादान
लग्नाच्या वेळी सोनिया गांधींचे कुटुंब इटलीत होते. त्यामुळे अमिताभ यांचे वडील हरिवंशराय आणि आई तेजी यांनी सोनियांचे कन्यादान केले.
 
लंडनमध्ये झाली होती पहिली भेट
भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील मुलगा राजीव गांधी आणि सोनिया मायनो यांची पहिली भेट लंडनमध्ये 1965 मध्ये झाली. सोनिया 1964 मध्ये ब्रिटनच्या कॅम्ब्रिज शहरात इंग्रजी शिक्षणासाठी आल्या होत्या, तर राजीव कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ ट्रिनिटीमध्ये शिक्षण घेत होते. राजीव आणि सोनिया यांची पहिली भेट एका रेस्तराँमध्ये झाली होती. सोनिया येथे पार्ट-टाइम जॉब करत होत्या. याच रेस्तराँमध्ये राजीव यांनी सोनियांना प्रथम पाहिले आणि पाहाताक्षणीच ते प्रेमात पडले.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोनिया - राजीव गांधी यांच्या लग्नाचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...