आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटालियन तरुणी अशी बनली गांधी घराण्याची सून, वाचा राजीव-सोनियांची इंटरेस्टिंग Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23वी मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी केल्यानंतर 3 महिन्यांनीच राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये निवडणूक सभेदरम्यान एका आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात हत्या झाली होती. नलिनी आणि तिचा पती मुरूगनसह तिघांना 28 जानेवारी 1998 रोजी राजीव गांधी हत्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. - Divya Marathi
23वी मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी केल्यानंतर 3 महिन्यांनीच राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये निवडणूक सभेदरम्यान एका आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात हत्या झाली होती. नलिनी आणि तिचा पती मुरूगनसह तिघांना 28 जानेवारी 1998 रोजी राजीव गांधी हत्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा 9 डिसेंबर रोजी जन्मदिन आहे. सोनिया गांधी देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास, राजीव गांधींशी प्रेम, लग्न, ते राजकारणात सक्रिय सहभाग यावर हा एक प्रकाशझोत.  देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राहिलेले राजीव गांधी यांना सोनियांशी पहिल्यांदा बोलण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. यानिमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना त्यांच्या पर्सनल लाइफशी निगडित काही खास बाबी सांगत आहे.

 

सोनियांच्या जवळ बसण्यासाठी राजीव यांनी pay केले होते दुप्पट बिल...
- राजीव गांधी यांनी सोनियांना पहिल्या वेळेस केम्ब्रिजच्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये पाहिले होते. त्यांना पहिल्यांदा पाहताच ते मोहित झाले. त्यांनी तुरंत रेस्टॉरंटच्या मालकाला सोनियांच्या शेजारची सीट देण्याची विनंती केली.
- एका मुलाखतीत त्या रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितले होते की, 'राजीव त्या इटालियन मुलीशेजारी बसू इच्छित होते. त्यांनी मला रिक्वेस्ट केली, पण मी त्यांना म्हणाला की या प्रिव्हलेजसाठी तुम्हाला दुप्पट बिल भरावे लागेल. यावर ते तयार झाले होते.'
- राजीव यांनी त्याच वेळी पेपर नॅपकीनवर सोनियांसाठी एक कविता लिहिली आणि त्या रेस्टॉरंटमधील सर्वात महागड्या वाइनच्या बॉटलसोबत सोनियांना पाठवली.
- सिमी गिरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत राजीव म्हणाले होते, ''सोनिया यांना पहिल्यांदा पाहताच मला जाणवले होते की ही मुलगी माझ्यासाठीच बनलेली आहे. त्या खूप स्ट्रेटफॉर्वर्ड आणि आऊटस्पोकन होत्या. कधीच काही लपवत नव्हत्या. त्या खूप मनमिळाऊ होत्या.''

 

पुढच्या 9 स्लाइड्समध्ये पाहा, राजीव आणि सोनियांशी निगडित फॅक्ट‌्स...

बातम्या आणखी आहेत...