आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींविरुद्ध खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात कलंकित खासदार व आमदारांवर असलेल्या गुन्ह्यांचा जलदगतीने निपटारा व्हावा म्हणून १२ नवी विशेष न्यायालये स्थापन केली जातील. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. अशा विशेष यालयांसाठी ७.८ काेटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.


लोकप्रतिनिधींविरुद्ध खटल्यांचा निकाल एक वर्षाच्या आत लावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्देशांवर सरकार काय करत आहे, अशी विचारणा १ नोव्हेंबर रोजी कोर्टाने केली होती. त्यावर केंद्राने हे शपथपत्र दाखल करून देशभर अशी १२ विशेष न्यायालये स्थापन केली जाणार असल्याचे सांगितले. देशात िकती खासदार -आमदारांवर खटले सुरू आहेत याची माहिती देण्यासाठी केंद्राने कोर्टाकडे मुदत मागितली.

बातम्या आणखी आहेत...