आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूच्या 48 वर्षांनीही हा फौजी करतोय बॉर्डरची रखवाली; चिनी सैनिकांना भरते धडकी, हे आहे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - सिक्किममध्ये भारत-चीन सीमेवर एक जवान असाही आहे जो मृत्यूच्या 48 वर्षांनंतरही बॉडरची सुरक्षा करत आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच विचित्र वाटेल, परंतु लोकांचे असेच मानणे आहे आणि लांबून लांबून लोक येथे बाबा हरभजन सिंग मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. एवढेच नाही, या जवानाने मृत्यूनंतर आपले सीमा रक्षणाचे कर्तव्य सुरू ठेवले आहे. 

 

13 हजार फुटांवर आहे मंदिर...
सिक्किमची राजधानी गंगटोकमध्ये जेलेप्ला खोरे आणि नाथुला खोऱ्यादरम्यान बांधलेले बाबा हरभजन सिंग मंदिर तब्बल 13 हजार फूट उंचीवर आहे. या मंदिरात बाबा हरभजन सिंग यांचा एक फोटो आणि त्यांचे सामान ठेवलेले आहे.

 

असा झाला बाबा हरभजन सिंग यांचा मृत्यू
असे सांगितले जाते की, 4 ऑक्टोबर 1968 रोजी सिक्किमच्या नाथुला पासमध्ये खोल दरीत पडल्याने जवान हरभजन सिंग यांचा मृत्यू झाला होता. स्थानिकांची अशी मान्यता आहे की, तेव्हापासून ते आतापर्यंत या जवानाचा आत्मा येथे बॉर्डरचे संरक्षण करत आहे.

 

चिनी सैनिकांनाही भरते धडकी    
सीमेवर बाबा हरभजन सिंग यांच्या उपस्थितीवर भारताच्या जवानांचा पूर्ण विश्वास आहे. सोबतच चीनचे सैनिकही ही गोष्ट मानतात की बाबा बॉर्डरची रखवाली करतात. कारण त्यांनीही बाबा हरभजन सिंग यांना मृत्यूनंतरही घोड्यावर स्वार होऊन बॉर्डरवर गस्त घालताना पाहिले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, कोण होते फौजी हरभजन सिंग...

बातम्या आणखी आहेत...