आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevis Fan Pays Tribute To Her Opens Restaurant Names Dishes After Sridevis Movies

श्रीदेवीचा जबरा फॅन; यांच्या रेस्तराँमध्ये वाढले जातात फक्त श्रीदेवीचे चित्रपट..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - भारतात सिनेसृष्टीच्या चाहत्यांची कमी नाही. चाहत्यांच्या अजब प्रेमाचे अनेक गजब किस्से तुम्ही यापूर्वीही ऐकलेले असतील. परंतु श्रीदेवीच्या एका चाहत्याची ही कहाणी तुम्हाला नक्कीच स्पर्श करून जाईल.  

 

जबरा फॅन

> श्रीदेवीच्या एका चाहत्याने चेन्नईत एक रेस्तराँ उघडले आहे. त्याचा पूर्ण मेन्यू फक्त श्रीदेवीच्या चित्रपटांच्या नावावरच आहे. म्हणजेच प्रत्येक डिशचे नाव श्रीदेवीच्या चित्रपटांवरूनच ठेवण्यात आले आहे. बालकलाकार म्हणून आपले फिल्‍मी करिअर सुरू करणाऱ्या श्रीदेवी सिनेसृष्टीत अखेरच्या श्वासापर्यंत सक्रिय होत्या. 'इंग्लिश विंग्‍लिश'मधून पुन्हा आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी श्रीदेवी शेवटची मॉम या चित्रपटात झळकली.

 

> चेन्नईतील या रेस्तराँचा मालक श्रीदेवींचा एवढा चाहता आहे की, त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 100 हून अधिक डिशेसची नावे हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांवरून ठेवली आहेत.

चेन्नईच्या या रेस्तराँच्या मुख्य दरवाजावर श्रीदेवीचे मोठे पोस्टर आहे. या रेस्तराँ मालकाने श्रीदेवीला डिशेसची नावे चित्रपटांच्या नावावरून ठेवण्याची परवानगीही मागितली होती आणि श्रीदेवीने ती दिली होती. विशेष बाब अशी की, या चाहत्याने फेब्रुवारीमध्येच रेस्तराँ उघडले होते आणि याच महिन्यात 25 फेब्रुवारीला श्रीदेवीचे देहावसान झाले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...