आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या.लोया : सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्येच सुनावणी; हायकोर्टात सुनावणीला बंदी करत याचिका वर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टिस लोया यांच्या मृत्यूशी संबंधीत सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. - Divya Marathi
जस्टिस लोया यांच्या मृत्यूशी संबंधीत सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी.

नवी दिल्ली- सीबीआय न्यायमूर्ती बी.एच. लोया यांच्या मृत्यूशी निगडित सर्व याचिकांवर आता फक्त सर्वाेच्च न्यायालयच सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व उच्च न्यायालयांना  याबाबतच्या याचिका मंजूर करण्यास मनाई केली. तसेच नागपूर खंडपीठ व मुंबई हायकोर्टात दाखल दोन्ही याचिकाही आपल्याकडे वर्ग करून घेतल्या. 


सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सांगितले की, याचिकांत मांडलेला मुद्दा गंभीर आहे. दरम्यान, मुंबईत वकिलांच्या संंघटनेकडून बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी महाराष्ट्र सरकारकडून सादर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  


दोन्ही बाजूंच्या वकिलांत तीव्र वादावादीनंतर काेर्टाने पुढील सुनावणीसाठी २ फेब्रुवारीची तारीख मुक्रर केली. तसेच सर्व पक्षकारांना लोयांच्या मृत्यूशी निगडित दस्तऐवज सादर करण्यास सांगितले. त्यावर सुनावणीत गांभीर्याने विचार केला जाईल. काँग्रेस नेते तहसीन पूनावाला आणि पत्रकार बी. एस. लोणे यांनीही सुप्रीम कार्टात याचिका दाखल करून न्या. लोयांच्या मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशीची मागणी केलेली आहे. 


महिला वकिलास सरन्यायाधीशांनी फटकारले

सुनावणीदरम्यान हरीश साळवे म्हणाले, सर्व बाबी मीडियात येऊ नयेत. त्यावर ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह म्हणाल्या, सुप्रीम कोर्ट अशा प्रकारच्या खटल्यात माध्यमांच्या वृत्तांकनावर बंदीचे आदेश देऊ शकत नाही. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा संतापून म्हणाले, मी अद्याप एकही शब्द उच्चारलेला नाही. माध्यमांना बंदीबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. हे चुकीचे आहे.   यामुळे मला दु:ख झालेले आहे. यानंतर इंदिरा जयसिंह यांनी विनाअट माफी मागितली.

 

> वकिलांचा आरोप : अमित शहांना वाचवले जातेय
> सध्या हा नैसर्गिक मृत्यूचाच खटला : न्या. चंद्रचूड

 

दुष्यंत दवे यांचा आरोप

हरीश साळवे हे अमित शहांचे वकील राहिलेले आहेत. यामुळे ते महाराष्ट्र सरकारकडून कशी काय बाजू मांडू शकतात? ते संस्थेचे नुकसान करत आहेत. त्यांना राेखले जावे. (हे सर्व अमित शहा यांना रोखण्यासाठी केले जात असल्याचे दवेंनी तीन वेळा ओरडून सांगितले.)

 

हरीश साळवे यांचा आक्षेप

वारंवार अमित शहा यांचे नाव का घेतले जात आहे? त्यांचे नाव घेण्यापासून दवेंना राेखण्यात यावे.

 

न्या. चंद्रचूड यांची फटकार : बेछूट आरोप करू नका
उभयतांत तीव्र वादावादी सुरू असताना दवेंना फटकारत न्या. चंद्रचूड म्हणाले, आजवर हे नैसर्गिक मृत्यूचेच प्रकरण आहे. कुणावरही बेछूट आरोप करू नका. न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत वृत्तपत्रांत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, न्यायालय वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या नव्हे, तर दस्तऐवजांवर विचार करेल.

 

CJI बेंच सर्व दस्ताऐवज पाहाणार 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्ट म्हणाले की जस्टिस लोया यांच्या मृत्यूशी संबंधीत सर्व दस्तऐवज बारकाईने तपासले जातील. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होईल. 
- दरम्यान, महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे, की 4 अधिकाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यात काहीही गडबड आढळून आलेली नाही. तीन न्यायाधीशांच्या पीठाने लोया यांचा मृत्यू ह्रदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...