आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील शोपिंया फायरिंग प्रकरणी आर्मी मेजर आदित्य विरोधात दाखल FIR वर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कोर्टाने केंद्र आणि जम्मु-काश्मीर सरकारकडून दोन आठवड्यात यावर उत्तर मागवले आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की मेजर आदित्यविरोधात या दरम्यान कोणतीही कारवाई करु नये. 27 जानेवारीला शोपिंया फायरिंगमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.
प्रश्नोत्तरातून जाणून घ्या शोपियां फायरिंग प्रकरण
Q. काय आहे शोपियां फायरिंग प्रकरण?
A - 27 जानेवारी रोजी आर्मीचा एक काफिला शोपियां येथील गनोवपोरा गावातून चालला होता. यावेळी आंदोलकांनी आर्मीच्या ताफ्यावर दगडफेक सुरु केली. प्रत्युत्तरात आर्मीने काही राऊंड फायर केले, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
Q. मग काय झाले?
A - शोपियां फायरिंग घटनेनंतर आर्मी ऑफिसरवर FIR दाखल करण्याचे आदेश महबूबा मुफ्ती सरकारने जम्मू-काश्मीर पोलिसांना दिले.
- पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये आर्मी मेजर आदित्यकुमार यांचे नाव आहे.
Q. कोणी दाखल केली सुप्रीम कोर्टात याचिका?
A - मेजर आदित्यकुमार यांचे वडील कर्नल कर्मवीरसिंह यांनी FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. त्यांचे म्हणणे आहे, की मुलाने (मेजर आदित्यकुमार) सैनिकांना वाचवण्यासाठी फायरिंग केली. त्यामध्ये चुकीचे असे काही नव्हते.
Q. याचिकेत काय म्हणाले मेजर आदित्यकुमार यांचे वडील?
A - सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत कर्नल कर्मवीरसिंह म्हणाले, 'माझा मुलगा मेजर आदित्यकुमार त्याच्या सहकाऱ्यांसह तणावग्रस्त भागातून जात होता. यावेळी त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांना अनेकदा आवाहन करण्यात आले, आर्मीला नुकसान करु नका असेही सांगण्यात आले. आर्मीसाठी रस्ता मोकळा करण्याचे दगडफेक करणाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. तरीही ते बाजूला झाले नाही. एफआयआरमध्ये मेजरचे नाव हे बदल्याच्या भावनेने टाकण्यात आले आहे.'
- याचिकेत म्हटल्यानुसार, रस्त्यावर बेकायदेशीर जमाव झाला होता. तो अतिशय उग्र होता. त्यांनी एका जेसीओला बेदम मारहाण करुन मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी फायरिंग करण्यात आले होते.
Q. आर्मीने या प्रकरणात काय म्हटले?
A- आर्मीच्या वतीने सांगण्यात आले होते की गढवाल युनिटच्या ज्या मेजरविरोधात पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न हे गुन्हे दाखल केले आहे ते मेजर घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर दूर होते.
- पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर आर्मीने शोपियां येथे दगडफेक करणाऱ्यांवर FIR दाखल केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.