आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून सिद्धू निर्दोष, मारहाणीच्या गुन्ह्यात 1 हजार रुपयांचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ३० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याची सर्वोच्च न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून मंगळवारी निर्दोष सुटका केली. मात्र, मारहाणीच्या आरोपात दोषी ठरवून १ हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान, सिद्धूचा मित्र रुपिंदरसिंग संधू याची दोन्ही आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. संजय किशन कौल यांच्या पीठाने १८ एप्रिल रोजी या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता.


१९८८ मध्ये पतियाळामध्ये झालेल्या या घटनेत पंजाब व हरियाणा हायकोर्टाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या निकालास सिद्धूने  सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

 

प्रकरण काय?
२७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळामध्ये सिद्धू कारने जात असताना त्याचा गुरनामसिंग या ज्येष्ठ नागरिकाशी वाद झाला. सिद्धूने केलेल्या मारहाणीत गुरनामचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी सिद्धू व त्याचा मित्र रुपिंदरसिंग याच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...