आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइक नाही, LOC पलिकडील फायरिंगमध्ये सैनिक ठार, 24 तासांत पाकची पलटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी पाकिस्ताने केलेल्या फायरिंगमध्ये एका मेजरसह 4 जवान शहीद झाले होते. सोमवारी कारवाई करत भारतीय लष्कराने LoC पलिकडे जात पाकच्या तीन जवानांना ठार केले होते. - Divya Marathi
शनिवारी पाकिस्ताने केलेल्या फायरिंगमध्ये एका मेजरसह 4 जवान शहीद झाले होते. सोमवारी कारवाई करत भारतीय लष्कराने LoC पलिकडे जात पाकच्या तीन जवानांना ठार केले होते.

इस्लामाबाद - पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये घुसून भारताने पाकिस्तानी सैनिकांना मारल्याच्या वक्तव्यावरून पाक सरकारने 24 तासांतच पलटी मारली आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हीस पब्लिक रिलेशन (ISPR) ने बुधवारी म्हटले की, सोमवारी सायंकाळी सीमेपलिकडून भारताने केलेल्या फायरिंगमध्ये त्यांचे तीन जवान ठार झाले तर एक जखमी झाला. त्यासाठी भारताने लाइन ऑफ कंट्रोल (LoC) क्रॉस केली नाही. ISPR ने मंगळवारी भारताने एलओसी पलिकडे जाऊन सर्जिकल स्ट्राइक केल्याचे मान्य केले होते. शनिवारी पाकिस्ताने केलेल्या फायरिंगमध्ये एका मेजरसह 4 जवान शहीद झाले होते.


भारतीय लष्कराने असे केले सर्जिकल स्ट्राइक-2 
आर्मीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'घातक' कमांडोज मधील 'छोटे ग्रुप' जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये सोमवारी सायंकाळी दाखल झाले. त्यात 5 कमांडो होते. त्यांनी पाकिस्तानच्या 59 बलूच रेजिमेंटच्या तीन सैनिकांना मारले. त्यात पाकचा एक सैनिक जखमी झाला. त्यांचे एक पोस्टही उध्वस्त केले. 


45 मिनिटांत परतले 
- आर्मीच्या मते हे ऑपरेशन सायंकाळी 6 च्या सुमारास राबवण्यात आले. कमांडो 45 मिनिटांत कॅम्पमध्ये परतले. 
- पाकिस्तानी मीडियाने इंटर सर्व्हीस पब्लिक रिलेशन्सच्या हवाल्याने या बातमीला दुजोरा दिला. 


2 दिवसांत मारले 5 सैनिक
राजौरी जिल्हा आणि पुंछमध्ये रविवारी भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी सैनिकांनाही भारतीय लष्कराने ठार केले होते. अशा पद्धतीने गेल्या दोन दिवसांत पाच पाकिस्तानी सैनिकांना मारण्यात आले. 


आधीच्या सर्जिकल स्ट्राइकशी तुलना नको 
- आर्मीतील सुत्रांच्या मते गेल्या वेळी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकशी याची तुलना करणे शक्य नाही. कारण कमांडोच्या अगदी लहान तुकडीने ही कारवाई केली. त्यांचे टार्गेटही लिमिटीडे होते. जशात-तसे प्रत्युत्तर देण्यासाठीही ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले. 
- गेल्यावर्षी 29 सप्टेंबरला भारतीय सैनिकांनी एलओसी पार जाऊन सर्जिकल स्ट्राइक केली होती. यात पाकिस्तानच्या सीमेतील लाँचपॅडला लक्ष्य करण्यात आले होते. 

 

दोन्ही सर्जिकल स्ट्राइकमधील फरक..

  सर्जिकल स्ट्राइक-1 सर्जिकल स्ट्राइक-2
केव्हा केले सप्टेंबर 2016 डिसेंबर 2017
कारण काय? पाक दहशतवाद्यांचा उरी कॅम्पवर हल्ला शस्त्रसंधीचे उल्लंघन 
काय झाले.. अनेक टेरर  लाँच पॅड उद्वस्त, 40 दहशतवादी ठार

 3 पाक जवान ठार

 

 

बातम्या आणखी आहेत...