आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वालालंपूर एअरपोर्टवर मुलाच्या मृतदेहासह अडकली आई, परत येण्यासाठी स्वराज यांनी केली मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी क्वालालंपूरमध्ये अडकलेली एक महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह क्वालालंपूरमधून आणण्यासाठी मदत केली. महिला तिच्या मुलाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात येत होत्या. पण क्वालालंपूर एअरपोर्ट (KLIA) वर अचानक तिच्या मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलाच्या मित्राने ट्वीट करून मदत मागितली होती. 


माझ्या मित्राचा मृत्यू झाला आहे, आई मृतदेह कसा आणणार?
रमेश नामनाच्या व्यक्तीने ट्वीटमध्ये लिहिले की, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तुम्हाला एक विनंती आहे. माझ्या मित्राची आई आणि मित्र ऑस्ट्रेलियाहून भारतात येत होते. क्वालालंपूर एअरपोर्टवर माझा मित्र अचानक पडला आणि त्याचा मृत्यू झाला. माझ्या मित्राची आई एअरपोर्टवर एकटी आहे. त्यांना मदत कशी मिळणार माहिती नाही. 


सुषमांनी दिले मदतीचे आश्वासन 
- रमेश यांच्या या ट्वीटवर सुषमा स्वराज यांनी त्यांच्या मित्राच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आणि क्वालालंपूरमधील भारतीय दुतावासाला संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, त्यांच्या मित्राचा मृतदेह सरकारी खर्चाने भारतात येईल. 
- सुषमा यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, भारतीय दुतावासाचे अधिकारी आणि मृतदेहासह महिलेला घेऊन चेन्नईला येत आहेत. 


विदेशातील भारतीयांना मदत पुरवण्यात सुषमा आघाडीवर 
- सुषमा स्वराज यांनी विदेशातील भारतीयाला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 
- काही दिवसांपूर्वीच राजस्थानच्या भानुप्रिया हरितवाल यांचे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यांना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली होती, पण अमेरिकन दुतावासातून व्हिसा न मिळाल्याने त्यांना अडचण निर्माण झाली होती. सुषमा स्वराज यांच्या पुढाकारानंतर व्हिसा जारी केला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणी झालेले ट्वीट्स...

बातम्या आणखी आहेत...